You are currently viewing शिवसेना सावंतवाडी संपर्कप्रमुख शैलेश परब यांना मातृशोक

शिवसेना सावंतवाडी संपर्कप्रमुख शैलेश परब यांना मातृशोक

सावंतवाडी :

 

शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख आणि मुंबई मनपाचे नगरसेवक शैलेश परब यांची आई शैलेजा दत्ताराम परब (वय ८०, मुळ कांदळगाव ता. मालवण, सध्या अंधेरी मुंबई) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, नातवंडे परिवार आहे.

शैलजा यांचे मुंबई जोगेश्वरी तसेच कांदळगाव गावामध्ये सामाजिक क्षेत्रात मोठे नाव होते. अनेक गरजवंतांना त्यांनी वेळोवेळी मदतीचा हात दिला होता. सामाजिक, कला, क्रीडा, राजकिय क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचे कार्य महान होते.तसेच मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका शिवानी शैलेश परब यांच्या त्या सासू, आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग चे खासदार विनायक राऊत यांच्या त्या मानस बहीण होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा