मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जावू नये – जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचा इशारा
सिंधुदुर्ग :
प्रादेशिक हवामान विभाग,मुंबई यांच्याकडून मिळालेल्या पूर्व सूचनेच्या अनुषंगाने अरबी समुद्राम ‘बिपर जॉय’ नावाचे चक्रीवादळ तयार झालेले असून या वादळामुळे दि. 7 ते 9 जून या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार आहे. मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जावू नये. तसेच जे मच्छिमार मासेमारीसाठी समुद्रात गेलेले असतील त्यांनी किनारी परत यावे. या कालावधीत समुद्र किनारी वेगाने वारे वाहणार असल्याने नागरिकांनी तसेच पर्यटकांनी समुद्र किनारी (बिचेसवर) जाणे टाळावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.
जिल्ह्यात दि. 7 ते 8 जून रोजी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असून दि.9 व 10 जून रोजी गडगडाट होवून पाऊस पडण्याची, विजा चमकण्याची व 30 ते 40 प्रती तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
तसेच दि. 7 जून रोजी रात्री 11.30 पर्यंत वेंगुर्ला ते वास्को या समुद्र किनारी 2.3 ते 3.2 मीटर च्या लाटा उसळणार आहेत अशी माहिती हैद्राबाद या संस्थेकडून प्रसारित करण्यात आलेली आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत करण्यात येत आहे.