You are currently viewing आंबोलीत तलाठी कार्यालय पावसाळ्यापूर्वी सुरू न झाल्यास ग्रामस्थांसह उपोषणाचा इशारा – अनिल चव्हाण

आंबोलीत तलाठी कार्यालय पावसाळ्यापूर्वी सुरू न झाल्यास ग्रामस्थांसह उपोषणाचा इशारा – अनिल चव्हाण

आंबोली

सुस्त प्रशासनाचा बेशिस्त कारभारामुळे आंबोलीत तलाठी कार्यालयासाठी लाखो रुपये शासन खर्च करून देखील तलाठी कार्यलय नाही.महसूल प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन जिल्हाधिकारी आणि तहसीलदार,प्रांत यांनी आंबोलीत पाऊस सुरू होण्याआधी तलाठी कार्यलय सुरू करावे.अन्यथा तहसीलदार कार्यालयासमोर ग्रामस्थांसाह उपोषणाला बसण्याचा इशारा अनिल चव्हाण यांनी दिला आहे.

आंबोलीत तलाठी कार्यालय हे गळक्या आणि नादुरुस्त इमारतीत सुरू असुन त्या ठिकाणी लाईट नाही.ऑनलाइन दाखले मिळत नाहीत,कोणतीही व्यवसथा नाही. तर आंबोलीत चारवर्षापासून तलाठी कार्यालय बांधून झाले गेली तीन वर्षे उदघाटन करण्यास मुहूर्त सापडत नाही. ठेकेदाराने उदघाटन करताना सर्व काम करून देणे आवश्यक आहे.ही इमारत ठेकेदाराकडून सर्वजनिक बांधकाम विभागाने सर्व काम करून घेणे आवश्यक आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने महसुलकडे ही इमारत ताब्यात देण्यापूर्वी सर्व काम करून देणे आवश्यक असते त्यानंतरच उदघाटन करणे क्रमप्राप्त ठरते.या ठिकाणी सध्या इमारतीची दुर्दशा झालेली असल्याने पुन्हा रंगरंगोटी करणे हे ठेकेदारचे काम आहे,ते न करताच त्याने इमारत दिल्यास त्याची अनामत रक्कम जमा करून त्याच्यावर कारवाई करून पुन्हा रंगरंगोटी करूनच उदघाटन करावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे.जनतेच्या पैशातून शासकीय निधीतून सरकारी कार्यलय हे सुशोभीतच असले पाहिजे.सध्या यात सार्वजनिक बांधकाम विभागाचा हलगर्जी पणा दिसत आहे त्यांनी ठेकेदार कडून हे काम करूनच इमारत तहसीलकडे द्यायची आहे.

अद्याप 3 वर्षे हे काम का होत नाही, ८ जून पासून प्रवेश प्रक्रिया महाविद्यालयात तसेच शाळेत सुरू होत असून दाखले देणार कुठुन ,तलाठी कार्यालय सोय काय? तलाठी तरी करणार काय?असा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे जिल्हाधिकारी प्रांत आणि तहसीलदार यांनी तात्काळ याकडे महसुलने लक्ष घालावे.पाऊस सुरू होण्यापूर्वी आंबोलीत तलाठी कार्यलय सुरू करावे अन्यथा सावंतवाडी तहसीलदार कार्यालयासमोर ग्रामस्थांसाह उपोषणाला बसण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी महसूल प्रशासनाला दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा