वेंगुर्ला
महाराष्ट्र शासनाच्या वतीने निर्धारित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण समितीची आढावा बैठक नुकतीच कुडाळ पंचायत समितीच्या सभागृहात नुकतीच संपन्न झाली.
या समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध लोककलेचा मागोवा घेत लोककलेचा संवर्धनासाठी शासन स्तरावर विशेष धोरण ठरविण्यासाठी सदर समिती विविध जिल्ह्यांत भेटी देत माहिती गठीत करण्याचे कार्य करत आहे.
याचा एक भाग म्हणून लोककला नी समृद्ध असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मध्ये संपन्न झालेल्या या समितीने भेट दिली यावेळी या आढावा बैठकीत महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण समितीचे प्रा.दौलत कांबळे ,प्रा.रुपेश कोडीलवार, प्रा.माणिक पट्टेबहाद्दूर हे उपस्थित होते.
कुडाळ चे गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध लोककलेचे लोककलावंत या वेळी या बैठकीला उपस्थित होते.
लोककला संवर्धनासाठी शासन स्तरावरून प्रयत्न होताना लोककलेचा संवर्धनासाठी लोक कलावंता कडून सुचना आणि धोरणात्मक निर्णय घेताना कोणत्या बाबी गरजेच्या आहेत या विषयावर सखोल चर्चा केली गेली.
या बैठकीत समिती,देवेंद्र नाईक,यांनी पाठ्यपुस्तकात दशावतार लोककलेचा समावेश व्हावा तर नाथा नालंग,यांनी कलावंतांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदतीसाठी विशेष शिष्यवृत्ती योजना राबविण्यात यावी याच बरोबर लोककला सांस्कृतिक धोरण समितीवर किमान एक तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोककलेची जाण असणाराच सदस्य असावा,तर सौरभ पाटकर यांनी गाडीचा विमा आणि आर.टी ओ पासिंग साठी विशेष सवलत देण्यात यावी तसेच कलाकरांना आजारपणात तात्काळ मदत मिळण्यासाठी आरोग्यदायी योजना राबवावी अशी आग्रही भूमिका मांडली.
दत्तप्रसाद शेणई,यांनी शासनाकडून लोककलावंतांना मिळणारे तुटपुंजे मानधन कलावंतांच्या खात्यात जमा व्हावे आणि कलावंतांची शासन दप्तरी नोंदणी करून त्यांना नोंदणी क्रमांक देण्यात यावे हि मागणी केली.
दशावतार लोककला अभ्यासक प्रा.वैभव खानोलकर यांनी दशावतार कलावंताची आरोग्य यंत्रणा मार्फत सातत्याने प्राथमिक तपासणी व्हावी याच बरोबर नोंदणी कृत लोककलावंताना शासनाने विमा संरक्षण योजना राबविण्यात सुरवात करावी.शासन स्तरावर विविध शासकीय दौरे एकाच मंडळाची मक्तेदारी ठरू नयेत तर इतर नाट्य मंडळाला हि या शासकीय दौरे करण्यासाठी संधी उपलब्ध होण्यासाठी कार्यवाही केली जावी याकडे लक्ष वेधले.
तर प्रा.अरुण मर्गज यांनी रंगभुषा व वेशभूषासाठी शासकीय अनुदान देण्यात यावे अशी मागणी केली या वेळी इतर कलावंत हि चर्चेत सहभागी झाले होते यांमध्ये समीर तेंडोलकर, शेखर शेणई , रूपेश नेवगी त्याच बरोबर आदीवासी लोककलेचा वारसा जतन करणारे चेतन गंगावणे आदी सह अनेक लोककला प्रेमी,हि यांची विशेष उपस्थिती होती.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोककला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा वारसा आहे आणि तो जतन करण्यासाठी शासन स्तरावर विशेष धोरण ठरविण्यासाठी आलेल्या समिती चे आभार गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी मानले आणि लोककलेतुन समृद्ध समाज कसा घडतो हे हि स्पष्ट केले.