कणकवली :
कणकवली येथे फ्लोरेट कॉलेज ऑफ डिजाईनिंग मार्फत मे महिन्यात युवतींना १५ दिवसीय मोफत फॅशन डिजाईनिंग बॅच सुरु करण्यात आली होती. ह्या बॅचला सिंधुदुर्ग वासियांकडून चांगला प्रतिसाद लाभला.
या प्रशिक्षणाच्या सांगता समारंभात प्रमुख पाहणे म्हणून अमोल भोगले सहाय्यक प्रकल्प अधिकारी व इंटरनॅशनल कराटेपटू वैभवी दत्तप्रसाद पेडणेकर, सार्था कदम, आनंद तांबे, अच्युत देसाई, आदर्श शिक्षक किशोर कदम, आर्या कदम तसेच मार्गदर्शिका सायली तळवडेकर मॅडम या उपस्थित होत्या. अमोल भोगले व वैभवी पेडणेकर यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. तसेच राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार प्राप्त वैभवी पेडणेकर हिचा सार्था कदम यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
बॅचचे विद्यार्थी स्वतः डिजाईन केलेल्या ड्रेस मध्येच कार्यक्रमात सहभागी होत असल्याचा आनंद विद्यार्थ्यांमध्ये दिसत होता. हिमानी, वैष्णवी ,सुजाता यांनी आपला अनुभव व्यक्त केला. अवघ्या 15 दिवसात खूप काही प्रोफेशनल दर्जाच्या गोष्टी बॅच मध्ये शिकता आल्या व उपक्रमाचा फायदा झाला म्हणून त्यांनी कॉलेजचे आभार मानले.
यावेळी अमोल भोगले मनोगत व्यक्त करताना म्हणाले सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी युवक व युवतींनी आर्थिक दृष्ट्या सक्षम होणे आवश्यक आहे यासाठी फ्लोरेट कॉलेज मार्फत संधी उपलब्ध झाली आहे त्याचा फायदा घ्यावा . मुंबई पुणे तील शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचे अभिनंदन केले.वैभवी पेडणेकर म्हणाल्या, प्रत्येक युवतीने आत्मनिर्भर होणे आवश्यक आहे.यासठी कौशल्य विकसित करणे गरजेचे आहे ते काम फ्लोरेट कॉलेज यानी प्रशिक्षण आयोजीत करुन एक नवा आदर्श निर्माण केला आहे. अशा उपक्रमांचा लाभ सर्वांनी घ्यावा. तसेच कॉलेजच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा ही दिल्या.
सार्था कदम यांनी नवीन करिअर संधी म्हणून जुलै 2023 पासून सुरु होणाऱ्या इंटिरिअर व फॅशन प्रोफेशनल डिप्लोमा – डिग्री कोर्सेस साठी जिल्ह्यातील सर्व दहावी – बारावी विद्यार्थ्याना प्रवेश घेण्यासाठी आवाहन केले आहे. आभार कॉलेजच्या व्यवस्थापिका मनीषा देसाई यांनी मानले.