इचलकरंजी : प्रतिनिधी
येथील शिवराणा युथ फोर्स बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने बुधवार दिनांक 7 जुन रोजी सायंकाळी 6 वाजता श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात हिंदूत्व जागरण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी हिंदुत्ववादी विचारवंत शरद पोंक्षे हे हिंदु संस्कृतीची गौरव गाथा, हिंदुत्व काल-आज-उद्या या विषयांवर मार्गदर्शन करणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजतिलक लाहोटी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
इचलकरंजीतील शिवराणा युथ फोर्स बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने गेल्या 5 वर्षांपासून हिंदु संस्कृती, धर्म आणि गो रक्षण याचबरोबर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. या संस्थेच्यावतीने 7 जून रोजी सायंकाळी 6 वाजता श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात हिंदुत्ववादी विचारवंत शरद पोंक्षे यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंंदुत्व जागरण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ते हिंदु संस्कृतीची गौरव गाथा, हिंदुत्व काल-आज-उद्या या विषयांवर मार्गदर्शन करणार असून या सभेस नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचे आवाहन राजतिलक लाहोटी यांनी पत्रकार परिषदेत केले.
यावेळी संस्थेचे रोहन हेरलगे, पवन भांगडिया, सनतकुमार दायमा, रमेशचंद लाहोटी आदींसह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.