सिंधुदुर्ग :
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सिंधुदुर्ग दौरा निश्चित झाला असून मुख्यमंत्री मंगळवार दि. 6 जून 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून कुडाळ येथील शासन आपल्या दारी या कार्यक्रमाबरोबरच सावंतवाडी,वेगुर्ला दौरा करणार आहे
मुख्यमत्र्याचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार दि. 6 जून 2023 रोजी सकाळी 9.45 मोपा, विमानतळ गोवा येथे आगमन व मोटारीने जयप्रकाश चौक,सावंतवाडी जि.सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 10.15 वाजता सावंतवाडी मतदारसंघातील विविध प्रकल्पांच्या भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ:- जयप्रकाश चौक, सावंतवाडी. सकाळी 11.30 वाजता सावंतवाडी येथून मोटारीने कुडाळकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- कुडाळ हायस्कुल कुडाळ. दुपारी 2 वाजता कुडाळ हायस्कुल येथून मोटारीने वेंगुर्लाकडे प्रयाण. दुपारी 2.30 वाजता मंत्री उदय सामंत, यांच्या निवासस्थानी, वेंगुर्ला येथे आगमन व राखीव. दुपारी 3.15 वाजता वेंगुर्ला येथून मोटारीने चिपी विमानतळाकडे प्रयाण. सायं. 4 वाजता चिपी विमानतळ सिंधुदुर्ग येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.