You are currently viewing ई बुक – एक अपूर्ण प्रवास

ई बुक – एक अपूर्ण प्रवास

*काव्यनिनाद साहित्य मंच पुणेच्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.प्रतिभाताई पिटके यांनी समूह संस्थापक श्री.विकासजी पालवे यांच्या ई बुक- “एक अपूर्ण प्रवास” या काव्यसंग्रहाचे केलेले रसग्रहण*

 

*ई बुक – एक अपूर्ण प्रवास..*

*- कवी श्री.विकास पालवे.*

 

*श्री. विकास पालवे (देवाची आळंदी) संस्थापक – काव्यनिनाद साहित्य मंच,पुणे. उत्तम ग्राफिक्सकार, गरजूंना मदत करणारे व स्वत:च्या कामावर निष्ठा असणारे! त्यांच्याविषयी लिहिण्यासारखे खूप काही!*

*पण ह्या माणसाला शब्दात बांधणे केवळ अशक्य! माझी ती पात्रता हि नाही ह्याची पूर्ण जाणीव मला आहे..*

 

*E book च्या माध्यमातून त्यांचा एक कवितासंग्रह नुकताच माझ्या पाहण्यात आला. काव्यसंग्रहाचे नाव आहे “एक अपूर्ण प्रवास!” ह्या संग्रहात एकूण 50 कविता आहे.*

*यातील कवितांविषयी लिहिण्याआधी थोडे विकास सराविषयी लिहले नाही तर कवितामधील भाव, आर्तता, त्यांची जिद्द ह्याला नीट न्याय देत येणार नाही असे माझे प्रामाणिक मत आहे.*

 

*कवीने अतिशय कष्टाने संकटे व विरोध झेलीत आपले एम. ए.एम. एड. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. मराठी व हिंदी ह्या दोन्हीवर त्यांचे किती वर्चस्व आहे ह्याचे त्यांच्या कवितेतून सहज दर्शन होते. त्यांची विचारांची सखोलता जीवनाकडे बघण्याची दृष्टी प्रत्येक कवितेतून आपण समजू शकतो.*

 

*चला तर आता..*

*एक अपूर्ण प्रवास भाग 1*

 

सुरवातीला कवीची प्रस्तावना वाचून उत्सुकता ताणली जाते व आपण वळतो *पहिल्या कवितेकडे, या कवितेचे नाव आहे “आर्त वेदना”*

*कवीने आयुष्यात अनुभवलेल्या चटक्यांचा चटका वाचणाऱ्यालाही बसेल इतकी दमदार ताकद ह्या कवितेत आहे .*

*कवी म्हणतो– करपलेले काळीज अन जळालेल्या भावना..*

*पूर्ण कविता तीव्र कटू अनुभव सांगत पुढे सरकते जीवन म्हणजे काय हे नीट समजण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागणार ह्या शेवटच्या ओळीं वर आपण निशब्द होतो. तोच दुसरी देशाभिमान व्यक्त करणारी “तिरंगा” कविता वाचतांना मन गुंग होत नाही तर तिसरी कविता संपवून पुढे पुढे वाचत गेल्यावर कवींच्या निरनिराळ्या भावना जणू आपल्याच आहेत, इतके आपण कवितेत रमून नाही गुंतून जातो.*

 

*बहुतेक कविता ह्या भावनाप्रधान आहेतत्यातली “माझी अर्धांगिनी” ही कविता त्यांचे पत्नीवरील डोळस प्रेमतिने संसारात दुःखात त्यांना जी साथ दिली, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते.* यातील पहिलीच ओळ माझ्या नावाचा शेवट तिच्या नावाची सुरवात ने कविता सुरू होते

 

भाव माझ्या मनातले रंगमंच जीवनाचा, पंख फुटले मला

आयुष्य कसं जगायचं? ह्या कविता वाचतांना कवीच्या हळव्या मनाशी आपण कधी एकरूप होतो हे कळेपर्यंत देशभक्ती, स्वातंत्र्याच्या नभात, रक्तदान एल्गार ह्या कविता वाचतांना आपल्यालाही देशासाठी काहीतरी कार्याला हवे असे वाटू लागते तोच माणूस, बहिणभाऊ आई आठवणीतला बाप ह्या कविता वाचतांना आपण भावविभोर होतो तर लगेचक्रांतीज्योती सावित्री सारख्या कविता आपल्याला वर्तमानात आणतात तर काही कविता देवाविषयी भक्तिभाव प्रगट करतात शेवटीअसलेल्या स्वाभिमान कवितेत कवी विकास सांगतो स्वाभिमानाचा उत्सव करू म्हणत आपल्याला एक नवीनच संदेश देताना स्वतःच्या स्वाभिमानी व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवितो

*एकंदरच हा कवितासंग्रह अतिशय छान झालेला आहे.* *एकदा सुरवात केल्यावर शेवटच्या कवितेपर्यंत न थांबता आपल्याला खिळवून ठेवण्याची ताकद ह्या संग्रहात आहे.*

 

*संग्रहाबद्दल लिहावे तेव्हडे थोडे!*

*त्यांच्याबद्दल माझ्या मनातल्या भावनाना वाट मिळाली.आणखीही त्यांचे 3 / 4 संग्रह तयार आहेत.* हिंदीत त्यांचे शायरी लेखन ही अप्रतिम आहे

असे हे विकास सर! त्यांच्या नावात असलेला विकास प्रत्यक्षातही त्याच्या जीवनात दिसून येतो माणूस म्हणूनही विकास खूप चांगला आहे आवड असली की सवड मिळते हे त्यांचे म्हणणे व ह्याची प्रचिती त्यांच्या कामावरून आपल्याला समजू शकते

*विकास सरांना पुढील लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा व मनापासून आशीर्वाद.*

 

*ई बुक परीक्षण*

*प्रतिभा पिटके, अमरावती.*

प्रतिक्रिया व्यक्त करा