*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा. सदस्या लेखिका कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*घाव*( वृक्षावरी )
नको माणसा नको
घालुस मजवर घाव
माणुसकीच्या जगतात
माणुस तुझे नावं?
सावली देतो, फुले देतो
औषधाची देतो मात्रा
नको घालुस घाव मजवर
गुण माझ्यात सतरा
फुले, फळे पानांनी
बहरली माझी कांती
घेतली माझ्या छायेत
तुचं की रे विश्रांती
झाडे लावा, झाडे जगवा
नारा फक्त्त सांगतोस
बघुन मला हिरवेगार
मलाच की रे मारतोस?
मीच ना रे उन्हातही
सावली तुजला देतो
आहे आज वृध्द मी जरी
माणुसकी विसरतो?
हिचं का रे माणसा
शिक्षा मजला देतोस
माणुस असुनही
इतका कृतघ्न होतोस?
*शीला पाटील. चांदवड.*