You are currently viewing वृक्षाचे मनोगत

वृक्षाचे मनोगत

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य कवीवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*🌷🍀 वृक्षाचे मनोगत 🍀🌷*

 

ह्या वनभूमीतून रोपटे झाड होत उगवले ।

पडले? वा फेकले बीज? कुणी हेतूने रोपले? ॥१॥

 

फिरता फिरता आज मला ते नजरेला पडले ।

थांबुन मी ही हितगुज केले , ते ही आनंदले ॥२॥

 

मीच पाहिला त्याच्या देही पशुपक्षांचा मेळा ।

त्यासमयी तो मला भासला विठूच लेकुरवाळा ॥३॥

 

सांगत होते ते मज सारी वार्ता कित्येक वर्षांची ।

सांगत असता अंतःकरणी कालव सुखदुःखाची ॥४॥

 

अवखळ वारा मीच अडवुनी दिला गारवा सकला ।

दिली तृप्तता हृदया छाया देऊन पांथस्थाला ॥५॥

 

फळेच दिधली त्यांना ज्यांनी दगडांनी ठेचले ।

दोर लावुनी घाव घालुनी कर माझे खेचले ॥६॥

 

वैद्यांना पंचांगे पुरवुन रुग्ण सर्व जगविले ।

कुसुमे सकला देऊन मी ही प्रतिमा—शव पूजिले ॥७॥

 

माझ्या आस्तित्वाने उत्सव—यज्ञ—सदन इथले ।

” मी हिरवा तर तू ही हिरवा ” तेच मला बोलले ॥८॥

 

पूर्ण भारती वर्षामध्ये धूम सुवर्णी होता ।

कारण माझे बांधव सारे क्षुपवेलीही होत्या ॥९॥

 

परंतु आता आज काळ हा कठिण अती पातला ।

नरदेहातुन अंश पशूचा सांग कुणी घातला ? ॥१०॥

 

विज्ञानाची कास धरुनी भ्रमिष्ट मानव झाला ।

इतुका की तो आज आमुची संगतही विसरला ! ॥११॥

 

संबंधांना तोडु नका हो एक सांगणे निर्वाणी ।

विसरलात तर अंतच तुमचा भाषा माझी गीर्वाणी ॥१२॥

 

🌺🌳🌸🌴🌹🌱🌷🌿💐☘🍁🎋

© रचयिता—कविवर्य

वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख

पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६

मो. ९८२३२१९५५०

८८८८२५२२११

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

*ह्या देशातील प्रत्येक राज्यातील व केंद्रातील सरकारांना विनंती की कृपया वृक्षतोड थांबवून नवीन वृक्ष लागवडीवरही भर द्यावा . तसेच प्रत्येक कक्षेत ( इयत्तेत वा क्लासमध्ये ) ” वृक्ष महती ” शिकवली जावी , अशी योजना असावी व प्रत्येक नागरिक वृक्षसंवर्धनाशी बांधला जावा .* 🙏🙏

प्रतिक्रिया व्यक्त करा