You are currently viewing किल्ले हनुमंत गडावर 6 रोजी भव्य दिव्य राज्यभिषेक दीन सोहळा

किल्ले हनुमंत गडावर 6 रोजी भव्य दिव्य राज्यभिषेक दीन सोहळा

दोडामार्ग :

 

किल्ले हनुमंत गडावर 6 रोजी भव्य दिव्य राज्यभिषेक दीन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळा सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्ग विभाग व देवी माऊली सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ फुकेरी यांच्या वतीने आयोजित करण्यात येत आहे.

सकाळी 6 ते 7 या वेळेत पूजन, 10 ते 11 या वेळेत वेशभूषा स्पर्धा, 11 ते 12.30 पर्यंत शिववाख्यान होणार आहे.

त्यानंतर मान्यवरांचे सत्कार होणार आहे. दुपारी 1 ते 2 या वेळेत गडावर उपस्थित असलेल्या सर्वांची भोजन व्यवस्था करण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी निलेश आईर 9421194430 किंवा चिंटू आईर 9823733494 यांच्याशी संपर्क साधण्याचे तसेच शिवप्रेमींनी गडावर मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभाग व श्री देवी माऊली सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ फूकेरी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा