You are currently viewing वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे..

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम लेख*

*वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे…*

कवी केशवसुतांनी म्हटलंय की,
*“वृक्ष ओढे वनराजी,वृत्ती रमे तेथे माझी”*
जिथे जिथे वृक्ष असतात; निर्झर असतात; अशा ठिकाणी माझ्या चित्तवृत्ती फुलतात. मन आनंदाने भरून येते. निसर्ग मानवाचा जन्मदाता आहे त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात माणूस गेला की त्याला आनंद होत असतो. निसर्गाचे ते अद्भुत लावण्य पाहूनच कविता करण्याची स्फूर्ती येते. खरंच…झाडे, वेली, फुले निसर्गाच्या सानिध्यात कवीला आणखी कशाचीही गरज नसते…चित्त पुलकित होतं अन् काव्य ओठी रेंगाळतं…
*”वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती…!!”*
संत तुकाराम महाराजांनी किती सुंदर शब्दात आपल्या भावमधुर काव्यातून वृक्षवल्लीला आपले सोयरे म्हणून गौरविले आहे…निसर्गाच्या सानिध्यात संत तुकारामांनी आनंद अनुभवलाय तोच या गीतातून मांडला आहे. वृक्ष आणि वेली निसर्गाचे सर्वोत्तम वरदान आहेत. धरणी मातेने आपल्या पदरात टाकलेला अनमोल खजिनाच…! माणूस हा स्वतःच्या गरजा स्वतःच भागवीत असतो परंतु अन्न, वस्त्र व निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा मात्र वृक्ष वेली निसर्गच भागवतो म्हणून तर तुकाराम महाराजांनी त्यांना सोयरे म्हटलं आहे…
*”कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी”*
असे म्हणणारे संत सावतामाळी निसर्गाशी एकरूप झालेले आपण पाहिले आहे.
*”ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा”*
असे म्हणत संत चोखामेळा यांनी आपले निसर्गप्रेम अभंगातून दाखवून दिले आहे. “श्रावणमास” सारख्या कवितांमधून सुद्धा आपण बालकवींचे निसर्गप्रेम पाहिलं आहे.
सज्जनांचे ऐश्वर्य परोपकारासाठी असते…
*”नास्ति मूलं अनौषधम्”*
या उक्तीप्रमाणे असे एकही मूळ नाही जे उपयोगी नाही. प्रत्येक झाडाचे, वेलीचे मानवासाठी, प्राणीमात्रांना काही ना काही उपयोग आहेतच. झाडाच्या मुळाशी सर्प, शेंड्यावर माकडे तर फुलांमध्ये भुंगे, ढोलीत पक्षी, पानांच्या झाली किडे, कीटक आश्रय घेतात. अनेक झाडे औषधोपचारासाठी वापरली जातात. आयुर्वेदामध्ये शेकडो झाडांचे गुणधर्म अन् उपयोग सांगितलेले आहेत. केवळ मानव झाडांचे औषधी गुणधर्म उपयोगात आणत नाहीत तर प्राणी देखील रोगांवर स्वतःहून झाडे, वेलींचा, गवताचा औषध म्हणून उपयोग करताना आपण पाहिलेले आहे. घरातील पाळीव कुत्रा, मांजर देखील चायपत्ती, परसात उगवलेले रानटी गवत चावताना पाहिले आहे. वृक्षांच्या मुळापासून पानांपर्यंत सर्वच अवयवांचा औषधी उपयोग आहे. *तुम्ही जे मागाल ते निसर्ग, झाडे, वेली तुम्हाला भरभरून देतील परंतु तुमच्या हव्यासाला मात्र निसर्ग पुरा पडणार नाही हे ही खरे…!*


पूर्वजांनी वृक्षांचे अनन्यसाधारण महत्त्व ओळखले होते. म्हणून तर झाड पानांचा उपयोग करून कोणतेही रासायनिक औषध न घेता पूर्वज शतक पार करून तंदरुस्त जीवन जगत होते. कडुलिंबाच्या काठीने दात घासून मजबुती राखत होते. सर्वच घरांच्या परसात तुळस, बेल, दुर्वा, पारिजात, अनंत, जास्वंद, पानवेल, शमी, आंबा अशी अनेक औषधी आणि देवकार्यात उपयोगी येणारी झाडे असायची. पिंपळ, वड, जांभूळ सारख्या अनेक उपयोगी झाडांचे संवर्धन केले जायचे. जास्तीत जास्त प्राणवायू सोडणारी झाडे घरांच्या आसपास मोकळ्या जागेत असायची. अगदी ऋषीमुनीनी देखील याच झाडांच्या छायेत बसून जप, तप, अनुष्ठाने केली, वेद रचले. गौतम बुद्धांनी देखील बोधी वृक्षाच्या छायेत बसून आत्मज्ञान प्राप्त केले होते. घरच्या परिसरात औदुंबर वृक्ष असायचा, तिथे पाणी साठा असणारच हे सांगायला ज्योतिषाची देखील गरज भासत नव्हती. दारातील तुळस, औदुंबर यांची नित्यनेमाने पूजा व्हायची.
आज संस्कृती बदलली, वैचारिक विकास झाला आणि मानसिक अधोगती झालेली दिसून आली. माणसांनी वृक्ष वेलींनी केलेले उपकार विसरून
*”कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ”*
या म्हणीप्रमाणे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली आणि जमिनीची धूप होण्यास, पर्जन्यमान कमी होण्यास, उष्णता वाढीस म्हणजे वातावरणातील सर्वच नकारात्मक बदलास मानव स्वतःच कारणीभूत ठरला. प्रदूषण, अवर्षण, जमिनीची धूप, डोंगरांचे उत्खलन, पाण्याची कमतरता, ग्लोबल वॉर्मिग, रोगराई आदी सारख्या संकटांना आम्ही स्वतःच निमंत्रण देत निसर्गाचं संतुलन बिघडवून बोलावून घेतले.
वृक्ष वेलीपासून आपल्याला काय मिळतं नाही? शितल छाया, जगण्यासाठी उपयुक्त असलेला प्राणवायू …जो कार्बनडाय ऑक्साईड स्वतः शोषून घेऊन वृक्ष आपल्याला देतात, मधुर फळे, फुले, पाने, औषधे, जळण, घरांसाठी लागणारे लाकूड, भाज्या, औषधी वनस्पती, कंदमुळे, रंगासाठी लागणारे प्राथमिक घटक आदी मिळतात. घराच्या बागेची शोभा वाढवतात वृक्ष वेली… बाग बगिच्यात विश्रांती घेणाऱ्या माणसांच्या मनाला शांती देतात बहरणारी झाडे, फुले…जमिनीची धूप थांबवतात…मुख्य म्हणजे उन्हात स्वतः तापतात आम्हाला सावली देतात…निडरपणे उंच टेकड्यांवर उभे राहून ढग अडवतात… मेघराजास बरसण्यासाठी उद्युक्त करतात…नद्या, नाले वाहण्यास कारण बनतात…पशू, पक्ष्यांना निवारा देतात. झाडे वेली निसर्ग आपल्या अनंत हस्तांनी मानवाला अमूल्य दान देत असतो…आपण ते घेतो…पशुपक्षी सुद्धा घेतात परंतु पशू पक्षी आपल्या बुद्धीचातुर्याने परतफेड करतात…संवर्धन करतात अन् मनुष्य मात्र आपल्या वाढलेल्या आवास्तव गरजा आणि अपेक्षांसाठी झाडांची अमानुष तोड करतो…निसर्गाचे नुकसान करतो. रासायनिक औषध फवारणी करून, जंगलात वनवा पेटवून झाडे वेली बरोबरच त्यांच्या जीवनचक्राचा भाग असणारे कीटक देखील नष्ट करतो आणि आपल्याच हाताने आपल्या भावी अस्तित्वाचा सर्वनाश करत आहोत.
*आपण फक्त कल्पना केली की, आपल्या आजूबाजूला वृक्ष नसले तर???*
राजस्थानात वाळवंट असतात तशी भकास जंगले आपल्याला पाहायला मिळतील. उजाड रानातून येणारी उष्ण हवा जगणे असह्य करेल. श्वास घेण्यासाठी लागणारा प्राणवायू सुद्धा विकत घ्यावा लागेल, जो झाडे वेली आपल्याला मोफत आणि वेळेवर देतात. अनेक कंपन्यांमधून निघणारा विषारी वायू देखील निसर्गच स्वच्छ करून चांगली शुद्ध हवा आपल्याला पुरवतो. एक झाड पूर्ण वाढण्यासाठी शेकडो वर्षे लागतात आणि आपण मात्र अत्याधुनिक यंत्रणा वापरून तेच झाड क्षणार्धात कापतो…हे आपलेच दुर्दैव आहे. अजूनही वेळ गेलेली नाही हे जाणत आज जेव्हा प्राणवायू विकत घ्यावा लागला तेव्हा लोक सुधरताना दिसू लागलेत. सरकारलाही जाग आली…सरकारनेही अनेक योजना राबवून वृक्ष लागवडीसाठी जनतेला प्रेरित केले.
*”वृक्ष लावा वृक्ष जगवा”*
असा नारा देत सरकारने वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न सुरू केलेत, अनेक कार्यक्रमात सत्कार सुद्धा फुले, शाल देऊन न करता एखादा वृक्ष देऊन केले जात आहेत. जनतेने सुद्धा *”निसर्ग माझा सोबती”*
म्हणजे मित्र मानून वृक्ष संवर्धन, जोपासना केली पाहिजे, आपल्या मित्राला जगवलं पाहिजे, मैत्रीला जागले पाहिजे. मानव हा निसर्गाचाच एक घटक असून सर्वात बुद्धिमान प्राणी आहे, त्यामुळे निसर्ग जोपासण्याची मानवाची जबाबदारी सर्वाधिक याचे भान राखले पाहिजे. राजस्थान मध्ये शेकडो वर्षांपूर्वी बिश्नोई समाजाने झाडे, झुडपे नष्ट होऊ नये म्हणून चिपको आंदोलन केले होते. निसर्गासाठी आपले जीव ओवाळून टाकले होते, तीच मानवता, निसर्गाबद्दल प्रेम आज पुन्हा जागृत होण्याची आवश्यकता आहे.
*५ जून हा आपला पर्यावरण दिन…!* या एकाच दिवशी निसर्गाचे गोडवे गाऊन, पर्यावरण रक्षणाच्या प्रतिज्ञा करून, नेत्यांची भाषणे आणि मुलांकडून निबंध लिहून घेऊन निसर्ग वाचणार नाही…तर लिहिलेल्या चांगल्या विचारांमधून प्रेरणा घेऊन झाडे, वेली, डोंगर, दऱ्या, नदी, नाले सर्व निसर्गाचे रक्षण करून तुकारामांच्या काव्यातील ओळी प्रमाणे वृक्षवल्लीना आपले सगेसोयरे बनविले तरच….भविष्यात झाडे, वेली जगतील…पर्यायाने मनुष्यप्राणी वाचतील…कवींना कवी कल्पना सुचतील अन् भावी पिढीला निसर्ग अनुभवता येईल…जो आपल्या पूर्वजांनी जपला म्हणून आज आपण अनुभवतो आहोत… तसाच…!!

म्हणून म्हणतो……

झाडे नि फुले बहरुन येती
पक्षी विहरति तया अंगणी
वसंत हृदयी असाच राहो
मनापासुनी हीच मागणी

नसेल जागा तेथे गच्ची
लावा झाडे कुंड्यांमधुनी
हर्ष गवसतो महत्त्व कळते
जपण्याचेही श्र्वासांमधुनी

माना झाडे सगेसोयरे
गरजेनुसार येती कामी
सुगंध दरवळ अनुभवण्याची
नकाच सोडू संधी नामी

मनी न अपेक्षा कधी ठेवती
वृक्ष नि वल्ली देतच जाती
शिकून घ्यावे आचरण असे
अतुट राहती अपुली नाती

©[दीपी]
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

 

👩‍💻🧑‍💻👩‍💻👨‍💻👩‍💻👨‍💻👩‍💻👨‍💻🧑‍💻

*_प्रवेश सुरू.. प्रवेश सुरू… प्रवेश सुरू….._*🏃‍♀️🏃‍♂️

*स्पर्धा परीक्षांमध्ये करिअर करायची सुवर्णसंधी*

*⚜️महेंद्रा ॲकॅडमी⚜️*

*🔰स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र🔰, सावंतवाडी*

*_🌎सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी चालू केलेली एक विशेष चळवळ_*

*_♻️सिंधुदुर्ग जिल्हा हा 10 वी 12वी च्या परीक्षांच्या निकालाचा विचार करता अग्रेसर जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण नंतर ही मुले कुठल्याही स्पर्धा परीक्षांमध्ये का दिसत नाहीत? स्पर्धापरीक्षांमध्ये आपला जिल्हा मागे का पडलाय? या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन आले आहे ? महेंद्रा अकॅडमी सावंतवाडी._*
*_♻️आगामी काळात सिंधुदुर्ग जिल्हा हा अधिका-यांचा जिल्हा म्हणून नावारुपाला येईल याचे सर्वतोपरी प्रयत्न महेंद्रा अकॅडमी तर्फे केले जातील._*

*🔰⚜️आमच्याकडे उपलब्ध कोर्सेस🔰⚜️👇🏻*

*1. 🔰राज्यसेवा , संयुक्त परीक्षा गट – ब ( PSI /STI/ASO) CDPO( महिला व बालविकास अधिकारी) व सर्व प्रकारच्या सरळ सेवा भरती*

*2.🔰पोलीस भरती स्पेशल बॅच – 2023*

*3.🔰 सर्व प्रकारच्या बँकिंग परीक्षा स्पेशल बॅच -2023*

🎉🎊🎊 *( नवीन बॅचेससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे)🎉🎊🎊*

*🔰आमच्या अकॅडमीची वैशिष्ट्ये🔰*-:

*📌अनुभवी शिक्षकवर्ग.*
*📌सुसज्ज वाचनालय.📚📚*
*📌अभ्यासाला पुरक आणि शांत वातावरण.*
*🏠निट व स्वच्छ वर्ग.*
*📌पिण्याचा पाण्याची सोय.*
*📌वाचनालयामध्ये प्रवेश घेण्याअगोदर वाचनालय बघायची संधी.*
*📌आकर्षक व उपयोगी पुस्तके वाचनालयामध्ये उपलब्ध.*
*📌अनोखी शिकवण्याची पद्धत*

*_👉आमच्या अकॅडमीला एकदा भेट द्या आणि आपल्याला पडलेल्या स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा._*
*_”मित्रहो” महेंद्रा अकॅडमी ही आपल्या जिल्ह्यातील तरुणांमध्ये असलेली उदात्त बुद्धिमत्ता तसेच आपल्या जिल्ह्यातील मुलांमध्ये अभ्यास करण्याची असलेली क्षमता ही संपूर्ण जगाला दाखवून देण्यासाठी चालू केलेली विशेष चळवळ आहे.आपल्या बहुमूल्य वेळेपैकी थोडा वेळ आमच्यासाठी काढा आणि आमच्या अकॅडमीला एकदा नक्की भेट द्या._*

*अधिक माहितीसाठी संपर्क करा*

*📲7350219093*
*📲9022686944*

*जाहिरात लिंक*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा