You are currently viewing बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी कोरोना योध्दांना पाठवल्या पोस्टाद्वारे दिवाळीच्या शुभेच्छा….

बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी कोरोना योध्दांना पाठवल्या पोस्टाद्वारे दिवाळीच्या शुभेच्छा….

बांदा

जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नं १ शाळेतील विद्यार्थ्यांनी दिवाळी सणाचेऔचित्य साधून कोवीड १९या महामारीच्या कालावधीत कोरोना योद्धा म्हणून काम करत असलेल्या व्यक्तींना पोस्टकार्डवर दिवाळी शुभेच्छा भेटकार्ड तयार केली व पोस्टाद्वारे रवाना केली. मार्च २०२०पासून शाळा बंद असल्या तरी बांदा केंद्रशाळेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी घरातूनच आॅनलाईन विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. मार्च महिन्यापासून गेले आठ महिने कोरोना योद्धा म्हणून काम करत असलेल्या डॉक्टर, पोलिस, नर्स, सफाई कामगार, पत्रकार तसेच अधिकारी व कर्मचारी वर्ग व आपल्या आप्तेष्टांना विद्यार्थ्यांनी शिक्षक व पालकांच्या मार्गदर्शनाखाली घराततूनच पोस्टकार्डवर आकर्षक सजावट करून त्यावर ‘कोरोना हरेल देश जिंकेल’ असे विविध प्रकारचे प्रबोधनात्मक संदेश लिहून पोस्टाद्वारे ही शुभेच्छापत्रे कोरोना योध्दांना व आप्तेष्टांना रवाना केली. शाळेच्या वतीने राबविलेल्या या उपक्रमासाठी उपशिक्षक श्री जे. डी. पाटील, श्री रंगनाथ परब सर्व सहकारी शिक्षक तसेच बांदा पोस्ट कर्मचारी यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमाचे मुख्याध्यापक सरोज नाईक,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मिरजकर, सरपंच अक्रम खान, केंद्रप्रमुख संदीप गवस, विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके व शिक्षण व आरोग्य सभापती सावी लोके यांनी कौतुक केले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा