विषारी द्रव पोटात गेलेल्या वायरी येथील तरुणाचा मृत्यू
मालवण
विषारी द्रव पोटात गेल्याने अत्यवस्थ बनलेल्या मालवण शहरातील वायरी हिंदळेकरवाडा येथील सागर केशव हिंदळेकर (वय ४२) व त्यांची पत्नी सौ. भारती सागर हिंदळेकर या दाम्पत्यावर उपचार सुरू होते. दरम्यान सागर हिंदळेकर यांचा ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर भारती हिंदळेकर यांच्यावर उपचार सुरु आहेत.याबाबत माहिती मालवण पोलीस स्थानकात देण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विलास टेंबूलकर हे तपास करत आहेत.