मुंबई मध्ये बेस्ट बसेस प्रवासी भार कमी करण्यासाठी मागवण्यात आलेल्या सिंधुदुर्गच्या एसटी च्या गाड्या या सुस्थितीत नसून त्यामध्ये अनेक गोष्टींच्या त्रुटी आढळून आलेल्या आहेत.
मुंबई सेंट्रल मधून ज्या काही नियमावली दिल्या गेल्या होत्या त्या नियमांना पायदळी तुडवून अजिबात सुस्थितीत नसलेल्या गाड्या मुंबईत पाठवण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मुंबईच्या प्रवाशांचे नाही एसटी महामंडळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चालक तसेच वाहक यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे असल्या गाड्यांची एसटी प्रशासनाच्या नियमावलीप्रमाणे त्रुटी दूर करून चालवाव्यात अन्यथा मा. हरी माळी यांच्या आदेशाने संपूर्ण गाड्यांची तपासणी करून सदर गाड्यांमध्ये त्रुटी आढळल्यास महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना असल्या गाड्या डेपोच्या बाहेर पडू देणार नाहीत असा सज्जड इशारा उपाध्यक्ष जेडी उर्फ बनी नाडकर्णी यांनी दिला आहे.