मान्यवरांचे लाभणार मार्गदर्शन
अमरावती दि.3-
स्थानिक डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या मिशन आय.ए.एस.अंतर्गत येत्या ६ जूनपासून १२ जूनपर्यत शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त एका सात दिवसांच्या स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या संस्कार शिबिराचे निमंत्रण राज्यसभा सदस्य खासदार डॉ. अनिल बोंडे अमरावतीच्या विभागीय आयुक्त श्रीमती निधी पांडे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री जयंत नाईक नवरे अमरावतीचे पोलीस आयुक्त श्री नवीनचंद्र रेड्डी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अविनाश बारगळ आयएएस अधिकारी श्री अनुराग घुगे (वाशिम) प्रा. विजय राऊत विभागीय उपायुक्त श्री संजय पवार सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव श्री सुधाकर मुरारे मुख्य अभियंता श्री गिरीश जोशी कार्यकारी अभियंता महावितरण श्री संजय शृंगारे पोलीस उपायुक्त श्री विक्रम साळी पोलीस उपायुक्त श्री सागर पाटील कॅप्टन अरविंद चांडक मुख्याधिकारी अक्षय गडलिंग मुंबईचे उपआयुक्त श्री मेहबूब कासार अमरावतीचे जीएसटी चे उपायुक्त श्री पाचरणे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री अभिषेक कासोदे प्रा प्रवीण खांडवे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री राहुल आठवले पोलीस निरीक्षक श्री अर्जुन ठोसरे पोलीस निरीक्षक श्री मनीष ठाकरे प्रा. शिवाजी कुचे किरण बनसोड प्रा. आशय रोकडे प्रा सोनल चांडक व प्रा प्रवीण गुल्हाने यांनी स्वीकारले असून या शिबिराला आय.ए.एस.च्या संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी दिल्लीवरून मालुका आयएएस अकादमीचे तज्ञ प्राध्यापक श्री प्रशांत भाग्यवंत व श्री अंकित राणे हे उपस्थित राहणार आहेत .सात दिवस चालणा-या या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व उत्तम करण्यावर भर देण्यात येणार आहे.शिवाय शालेय जीवनापासून तसेच दहावी बारावी पासून कलेक्टर होण्यासाठी ज्या पायाभूत गोष्टी कराव्या लागतात त्याचे संपूर्ण ज्ञान विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे . याशिवाय सराव परीक्षा ज्ञानसाधना मुलाखत तंत्र स्पर्धा परीक्षेची एबीसीडी या सर्व बाबी दिल्लीवरून आलेले स्पर्धा परीक्षेचे तज्ञ विद्यार्थ्यांना शिकविणार आहेत. हे शिबीर अमरावती मार्डी रोडवरील श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल जवळील ग्रीन सर्कल या जगप्रसिद्ध संस्थेमध्ये आयोजित करण्यात आले असून या शिबिरामध्ये बाहेर गावावरून ऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांची भोजन व निवास व्यवस्था करण्यात आली आहे . डॉ.पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी ही भारतातील सुप्रसि अकादमी असून या संस्थेमध्ये फक्त एक रुपया इतक्या नाममात्र शुल्कामध्ये शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे धडे दिले जातात .या संस्थेमध्ये आतापर्यंत 350 आयएएस आयपीएस आयआरएस सनदी व राजपत्रित अधिकाऱ्यांनी भेटी दिलेल्या आहेत. इतक्या मोठ्या संख्येने आयएएस अधिकारी सहभागी झालेली ही भारतातील एकमेव संस्था आहे. या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन या समितीचे स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ.व्ही.टी. इंगोले व मिशन आयएसचे संचालक प्रा डॉ नरेशचंद्र काठोळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे केली आहे.
प्रकाशनार्थ प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक डॉ. पंजाबराव देशमुख अकॅडमी .
अमरावती