मुंबई, प्रतिनिधी :
नेव्हल डॉकयार्ड मुंबई, भारतीय नौसेना येथील कर्तव्यदक्ष व आदर्श कर्मचारी, निष्कलंक व्यक्तिमत्व दिलीप लक्ष्मण सारंग हे ३६ वर्षाच्या यशस्वी सेवेनंतर वरिष्ठ इंजिन चालक या पदावरून १ जून रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांचा सेवापूर्ती सोहळा कांजूरमार्ग येथील नेव्हल डॉकयार्ड काॅलनीतील सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
सन १९८६ साली खलाशी या पदावर ते नेव्हल डॉकयार्ड सेवेत रुजू झाले. दरम्यान, त्यांचे वडील बंधू विठ्ठल तथा अण्णा सारंग यांच्या कामकाजाची पद्धत त्यांनी जवळून पाहिली होती. त्यामुळे त्यांनी अल्पावधीत उत्कृष्ट सेवा देण्यात त्यांनी प्राथमिकता दिली. आणि चकमदार कामगिरी बजावली यात त्यांनी आपलं कौशल्य दाखवून मोठे योगदान दिले.
या योगादानाबददल नेव्हल डॉकयार्ड कडून वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले व त्यांच्या कार्याची दखल घेतली.व सर्व सहकाऱ्यांकडून शाबासकी देखील मिळवली.
सेवापूर्ती निवृत्ती समारोपप्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात नेव्हल डॉकयार्ड युनियन माजी संचालक अशोक पाताडे, मस्जिद चौगुले, साहित्यिक, स्तंभलेखक व जेष्ठ पत्रकार प्रमोद कांदळगावकर,अविनाश नवगिरे, सुरेश कांदळगावकर, अर्चना मोंडकर – सारंग, मुख्याध्यापिका प्रिती सारंग, विठ्ठल सारंग आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांनी आपल्या मनोगतात दिलीप सारंग यांच्या कामकाजाची पद्धत उद्दिष्टे आणि आठवणी जाग्या केल्यात.मान्यवराच्या हस्ते सारंग यांचा शानदार सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी नेव्हल डाॅकयार्ड मधील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी,आप्तेष्ट नातेवाईक मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माणिक कारंडे यांनी सुरेख केले.