You are currently viewing दोडामार्ग तालुक्याचा दहावी शालांत परिक्षा निकाल ९६.३६ टक्के

दोडामार्ग तालुक्याचा दहावी शालांत परिक्षा निकाल ९६.३६ टक्के

दोडामार्ग

मार्च मध्ये घेण्यात आलेल्या दहावी शालांत परिक्षेचा दोडामार्ग तालुका निकाल ९६.३३ टक्के लागला आहे. तालुक्यात एकूण बारा विद्यालय निकाल शंभर टक्के लागला आहे. काही विद्यालय निकाल शंभर टक्के परंपरा कायम ठेवली आहे.

अनेक मुलीनी यावेळी घवघवीत यश संपादन केले आहे. करुणा सदन साटेली भेडशी आवाडा हायस्कूल शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. या हायस्कूल मधिल विद्यार्थी दोडामार्ग तालुक्यात प्रथम आले आहेत. दोडामार्ग तालुक्यात ३६७ पैकी ३६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दोडामार्ग तालुक्यात करुणा सदन हायस्कूलचा अथर्व गवस हा ९५.०० टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम तर प्रणिता पालवे ही ९४.६० टक्के गुण मिळवून तालुक्यात दूसरी आली आहे. तर दोडामार्ग हायस्कूलची वेदीका नाईक हि ९४.४० टक्के गुण मिळवून दोडामार्ग तालुक्यात तिसरी येण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा