You are currently viewing बांधकामासाठी चिरा/जांभा दगडासाठी…

बांधकामासाठी चिरा/जांभा दगडासाठी…

स्थानिकांना पूर्वीप्रमाणेच मिळणार तात्पुरते परवाने

सिंधुदुर्ग

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिकांना चिरा/जांभा दगडाचे (लॅटराईट स्टोन) स्थानिकांना बांधकामासाठी उत्खनन करता येणार आहे. त्यासाठी पूर्वीप्रमाणेच परवाने देण्याबाबतच्या निर्णयाचे पत्र महसूल विभागामार्फत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

 दरम्यान केंद्र शासनाच्या दि. 10 फेब्रुवारी 2015 च्या अधिसूचनेनुसार गौण खनिजांचे उत्खनन करु नये, अशा सूचना जारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यातील चिरा खाणींमध्ये बांधकामसाठी चिरा/जांभा पाडणे शक्य नसल्याने येथील स्थानिकांना बंदी होती.

 त्यानुषंगाने पूर्वीप्रमाणे वैयक्तिक बांधकामासाठी चिरा/जांभा पाडता यावा, यासाठी खनिकर्म राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड कु.आदिती तटकरे व खासदार श्री. सुनील तटकरे यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे आता यापुढे चिरे खाणींच्या मालकांना पूर्वीप्रमाणेच तात्पुरते परवाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळणार आहे. परंतु चिरा/जांभा दगडाचे (लॅटराईट स्टोन) वापर औद्योगिक प्रयोजनार्थ होणार नाही, याची दक्षता घेण्याबाबतच्या सूचनाही महसूल विभागातून निर्गमित पत्राद्वारे संबंधितांना देण्यात आल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा