You are currently viewing सौ. स्नेहा दळवी यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान

सौ. स्नेहा दळवी यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान

कुडाळ :

 

कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्त महिला व बाल विकास विभाग यांच्या तर्फे शिवसेनेच्या कुडाळ तालुका महिला संघटक स्नेहा दळवी यांना 2023 -2024 चा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. वेताळ बांबर्डे सरपंच सौ. वेदिका दळवी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

या वेळी उपसरपंच प्रदीप गावडे, ग्रामसेवक डी.बी.पिंटो, सदस्य दशरथ बांबर्डेकर, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. साजुराम नाईक, तलाठी रविकांत तारी, सोसायटी संचालक कांता गावडे, ग्रामपंचायत सदस्य स्वप्नाली गावडे, सृष्ट्ठी सावंत, सामंत, तसेच अंगणवाडी सेविका पाटील मॅडम, नाईक मॅडम, कलिंगण मॅडम व आशा सेविका, सी. आर.पी. देवर, रेणुका कदम, साळसकर, ग्रामपंचायत लिपिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा