*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री अनघा अनिल कुळकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*स्नेहाचा मळा*
शब्द धन गीत मधुर मंजुळ
मने जुळवी अतुट धागा प्रेमळ
हरवलेली नाती येती जवळ
मनामनाची जुळवीतसे नाळ ||१||
शब्दधन संपत्तीचा होता मेळ
अप शब्दांचा न गाठावा तळ
शब्दप्रीत जुळवी प्रेमाचा खेळ
कठोर शब्दांनी न करावे घायाळ ||२||
सुरेल शब्दांचा जमे ताळमेळ
शब्दच घाली शब्दांचा घोळ
शब्दधन फुलवी स्नेहाचा मळा
रचावी सहज अर्थपूर्ण ओळ ||३||
मनात रुजवावे शब्दांचे मळे
भावसुमनांनी भरावी ओजंळ
ह्रदयी भक्तीपुष्प मंद दरवळे
समर्पित होई भगवंता जवळ ||४||
सौ. अनघा अनिल कुळकर्णी
पुणे🙏