You are currently viewing तळेरे हायस्कूलच्या विद्यार्थिनींचे नवोदय परीक्षेत यश

तळेरे हायस्कूलच्या विद्यार्थिनींचे नवोदय परीक्षेत यश

कणकवली :

वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या जुई अमोल मेस्त्री व स्वरा सुभाष परब या विद्यार्थिनींनी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत यश संपादन केले. या परीक्षेमध्ये इयत्ता सहावीसाठी या दोन विद्यार्थिनींची पहिल्याच फेरीत निवड झाली असल्याने दोघींचे आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
यशस्वी विद्यार्थिनींना एस.यु.सुर्वे ,ए.बी.कानकेकर, अजिंक्य तांबे यांनी मार्गदर्शन केले.त्यांना प्राचार्य अविनाश मांजरेकर,सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांचे सहकार्य लाभले.
या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरविंद महाडिक,सर्व सदस्य,प्राचार्य अविनाश मांजरेकर,सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी,शिक्षक-पालक संघ,माजी व आजी विद्यार्थी तसेच ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा