You are currently viewing कोकण रेल्वेच्या महत्त्वपूर्ण  समस्या सोडवण्यासाठी राणेंची रेल्वे मंत्र्यांसोबत भेट !

कोकण रेल्वेच्या महत्त्वपूर्ण समस्या सोडवण्यासाठी राणेंची रेल्वे मंत्र्यांसोबत भेट !

मुंबई :

 

केंद्रीय सुक्ष्म, मध्यम व लघू उद्योग मंत्री नारायण राणे यांनी बुधवारी रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांच्या समेवत बैठक घेवून कोकणाच्या दृष्टीने महत्वाच्या विषयावर चर्चा केली. या चर्चेतून गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागले आहे. या संदर्भात नारायण राणे यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची बुकींग आरक्षण सुरू झाल्यानंतर काही मिनिटांमध्ये फुल झाली होती. या तिकीट बुकींगमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप कोकणवासियांकडून करण्यात आला होता. त्यासंदर्भात चौकशी करण्यात येणार असल्याचे आश्वासन रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांनी दिले. तसेच अतिरिक्त हॉलीडे स्पशेल ट्रेन सोडण्याबाबत योग्य तो काढणार असल्याचे वैष्णव म्हणाले.

तुतारी एक्सप्रेस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव स्टेशनवर थांबविण्यात येईल असे रेल्वे मंत्र्यांनी सांगितले. तसेच कोकण रेल्वे वरील वंदे भारत सेवेला कण्कवली येथे थांबा देण्याचा निर्णय झाला असून, कोकणाच्या पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाच्या मिनी टॉप ट्रेन बाबत सकारात्मक चर्चा झाली. पडवे येथील रेल्वेचा अंडरपास बांधण्याच्या प्रस्तावास रेल्वे मंत्र्यांनी मान्यता दिली असल्याची माहिती नारायण राणे यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा