You are currently viewing सर्वसामान्यांचे आर्थिक जीवनमान सुधारण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक कटीबद्ध – मनीष दळवी

सर्वसामान्यांचे आर्थिक जीवनमान सुधारण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक कटीबद्ध – मनीष दळवी

जिल्हा बँक ओसरगांव शाखा स्थलांतर सोहळा संपन्न!

कणकवली

सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही सर्व जिल्हावासयांची, शेतक-यांची,सर्वसामांन्याची बँक आहे.या बँकेला आपली बँक समजून कर्ज,ठेवी यासारखे सर्व आर्थिक व्यवहार ओसरगाव पंचकोशी मधील सर्व व्यापारी, शेतकरी, उद्योजग स्थानिकांनी करावेत. या सर्वांसाठी चांगली सेवा बँकेच्या ओसरगांव शाखेमार्फत दिली जाईल. या शाखेच्या माध्यमातून व्यवसाय उभा करण्यासाठी सर्वांनी फायदा घ्यावा. शेतकऱ्यांनी शेती उत्पादनात वाढ करण्यासाठी जिल्हा बँकेच्या सर्व सेवांचा उपयोग करून घ्यावा. शेती उत्पादनात वाढ करत असताना आपले आर्थिक जीवनमान सुधारण्यासाठी जे जे काही सहकार्य लागेल ते सर्व काही सहकार्य जिल्हा बँक देण्यासाठी आपल्याशी कटिबद्ध राहील अशी ग्वाही जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी ओसरगांव येथे दिली

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या ओसरगांव शाखा स्वमालकिच्या नुतन इमारतीचा स्थलांतर सोहळा संपन्न झाला. नुतन शाखा इमारत स्थलांतर सोहळ्याचे उद्घाटन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.तर नविन एटिम चे उद्घाटन जिल्हा बँक संचालिका सौ.प्रज्ञा ढवण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती जिल्हा बँक संचालक समीर सावंत,विद्याधर परब, ओसरगावच्या सरपंचा सौ. सुप्रिया कदम, लिंग माऊली वि.कार्यकारी सह. सोसायटी ओसरगांवचे अध्यक्ष मुरलीधर परब,ओसरगांवचे माजी सरपंच प्रमोद कावले, बोर्डवे सरपंचा सौ.वेदांगी पाताडे,उपसरपंच महावीर साळवी,जिल्हा बँकेचे मुख्य कार्य अधिकारी प्रमोद गावडे,ओसरगांव शाखा व्यवस्थापिका सौ.सविता राठोड,सागर साटम,तालुका विकास अधिकारी बापू गवाणकर, राजीव सावंत जिल्हा बँकेचे अधिकारी, कर्मचारी ओसरगांव चे ग्रामस्थ,ग्राहक,ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा