इचलकरंजी : प्रतिनिधी
इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांना नुकताच मुंबई येथे उल्लेखनीय प्रशासकीय कार्याबद्दल नवभारत ग्रुपच्या ‘नवराष्ट्र गुड गव्हर्नन्स २०२३’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दैनिक नवभारत आणि नवराष्ट्र ग्रुपच्या वतीने प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय आणि महत्वपूर्ण कार्य केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा ‘नवराष्ट्र गुड गव्हर्नन्स ‘ हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. इचलकरंजी महानगरपालिकेचे पहिले आयुक्त तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांनी इचलकरंजी नगरपरिषदेचे इचलकरंजी महानगरपालिकेत रुपांतर झाल्यानंतर केलेल्या उल्लेखनीय प्रशासकीय कार्याची दखल घेऊन नवभारत ग्रुपच्या वतीने त्यांना ‘नवराष्ट्र गुड गव्हर्नन्स २०२३’ चा आदर्श आयुक्त पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. नवभारत ग्रुपचे एम.डी. निमिश माहेश्वरी यांनी मुंबई येथे २९ मे रोजी आयुक्त सुधाकर देशमुख यांना सन्मानपत्र बहाल केले. या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.