You are currently viewing वसईत स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती जल्लोशात साजरी

वसईत स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती जल्लोशात साजरी

वसई (गुरुदत्त वाकदेकर) :

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १४० व्या जयंती शिवसेना वसई तालुकाच्या वतीने हुतात्मा बाळा सावंत स्मारक पापडी येथे उत्साहात साजरी केली गेली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, भारतमाता, शिवप्रतिमेस तसेच सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन आणि मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून व हुतात्माना वंदन करून करण्यात आली. या कार्यक्रमाला वसईतील सुप्रसिद्ध गायक डॉ. संपदा पोतदार, हेमाली पिंगळे,आरोही राऊत, अमेय सातघरे, योगेश पिंगळे, वैभव वसईकर यांनी साथसंगत देऊन सावरकरांच्या गीतांचे सादरीकरण करून परिसर मंत्रमुग्ध केला.

वसईचे सुपुत्र व सावरकरप्रेमी राहुल अनंत भंडारकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर व्याख्यान दिले. तद्नंतर उपस्थित जणांना सावरकरांवर चित्रफित दाखवण्यात आली. यावेळी केंद्रीय गृह खात्याला उपस्थितांच्या हस्ताक्षराचे पत्र देऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न प्रदान करा ही आग्रहपूर्वक मागणी प्रामुख्याने करण्यात आली. या कार्यक्रमाला शिवसेनेचे पालघर जिल्हाप्रमुख पंकज देशमुख, संपर्कप्रमुख जगदीश कदम, उपजिल्हाप्रमुख जनार्दन म्हात्रे, युवासेना जिल्हा संघटक सिद्धेश जोगळे, शहर प्रमुख प्रथमेश राऊत यांचे स्वातंत्र्यवीरांची प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना तालुकाप्रमुख राजाराम बाबर, संकल्पना शिवसेना वसई शहर समन्वयक निलेश भानुशे, तालुका समन्वयक योगेश पाटील, कार्यकारणी सदस्य जयेश राऊत, शहर प्रमुख संजय गुरव यांनी नियोजनबद्ध पद्घतीने केले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम गाऊन करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा