You are currently viewing कणकवली शिवसेना शिंदे गटाच्या महिला उपतालुका प्रमुख आयेशा सय्यद यांचा राष्ट्रीय काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

कणकवली शिवसेना शिंदे गटाच्या महिला उपतालुका प्रमुख आयेशा सय्यद यांचा राष्ट्रीय काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

कणकवली तालुका काँग्रेसने शिवसेना शिंदे गटाला पुन्हा एकदा दिला धक्का

कणकवली

कणकवली तालुका महिला उप तालुकाप्रमुख आयेशा सय्यद यांची शिवसेना शिंदे गट, पक्षात घुसमट झाल्यामुळे काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाला जोरदार धक्का बसला आहे . यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष श्री .प्रदीप मांजरेकर व महिला तालुका अध्यक्ष सौ .अमृता मालडंकर यांच्या उपस्थितीत त्यांचे पक्षात स्वागत केले व त्यांचा काँग्रेस पक्षामध्ये यथोचित सन्मान केला जाईल असे यावेळी तालुका अध्यक्ष यांनी ग्वाही दिली.तसेच त्यांच्या प्रवेशाने काँग्रेस पक्षाला बळकटी मिळाली आहे व यावेळी त्यांची महीला काँग्रेस जिल्हाध्यक्ष सौ साक्षी वंजारी यांच्या सहमतीने कणकवली तालुका उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे व त्या पदाचा योग्य तो न्याय देण्याचे आश्वासन नवनियुक्त तालुका उपाध्यक्ष आयेशा सय्यद यांनी दिले आहे.
तसेच यावेळी अक्षय घाडीगावकर यांना कणकवली शहर युवक उपशहराध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे .यावेळी युवकांना एकत्रित करून काँग्रेसची ताकद वाढवण्याची ग्वाही यावेळी कणकवली शहर युवक उपशहराध्यक्ष अक्षय घाडीगावकर यांनी दिली. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रवीण वरूनकर ,तालुका सरचिटणीस महेश तेली ,शहराध्यक्ष अजय मोरये , सौ.गौरी तेली,डॉ.प्रमोद घाडीगावकर ,प्रदीप कुमार जाधव ,अमित मांडवकर ,निलेश मालडंकर, अक्षय घाडीगावकर , पंढरी पांगम आधी पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा