You are currently viewing कणकवली रेल्वे स्थानकात अंडरग्राउंड पूल व्हावा!

कणकवली रेल्वे स्थानकात अंडरग्राउंड पूल व्हावा!

*कणकवली रेल्वे स्थानकात अंडरग्राउंड पूल व्हावा!*

-प्रमोद कांदळगावकर
भांडुप गाव, मुंबई

कोकण रेल्वे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून धावू लागली. ती आज गोवापर्यंत पोहचली. प्रवाशांचा वेळ वाचला. काही अवशी प्रवास सुखकर झाला. तर एकेरी लाईन टाकल्याने तो प्रवास त्रासदायक ठरतो आहे. गाड्याची संख्या वाढविली. एक पदरी रेल्वे वाहतूकीमुळे प्रवाशांना मात्र यातना होताना दिसतं आहेत. कोकण रेल्वे मार्गावरील मध्यवर्ती कणकवली रेल्वे स्टेशनला मुंबई दिशेकडून येणाऱ्या गाड्या बऱ्याच वेळा प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर येत असल्याने उतरणाऱ्या प्रवासी व पर्यटकांना मनस्तापाला सामोरे जावे लागतं. त्यासाठी नवी मुंबईच्या धर्तीवर अंडरग्राऊंड रस्ता बनवला गेल्यास कित्येक वयस्कर प्रवासी त्याचा लाभ घेऊ शकतील. कणकवली स्थानाकावर उतरल्यावर भर उन्हातून, पावसाळ्यात निमूळत्या ओवर ब्रिज वरून आपल्या सामानासह जीवाची घालमेल आणि ओढाताण करत प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर यावं लागतं आणि त्यानंतर पुन्हा खाली उतरून आपल्याला परवडेल त्या प्रवासी साधनाचा शोध घ्यावा लागतो. त्यापेक्षा दोन्ही प्लॅटफॉर्मला जोडणारा अंडरग्राऊंड मार्ग बांधण्यात आल्यास प्रवाशांची गैरसोय दूर होईल. यासाठी केंद्र सरकाराने व कोकण रेल्वे महामंडळाने पुढाकार घ्यावा. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जात असल्याने लाखो प्रवासी वर्षभरामध्ये प्रवास करतात. यांची दखल घेऊन प्रवाशांना न्याय द्यावा अशी मागणी प्रवासीवर्गाकडून करण्यात येत आहे.

🎋🎋🌾🌾🌴🌴🌱🌱🎋🎋🌾

*_शेतकरी, कष्टकरी बांधवांसाठी एक छोटीशी मदत_*

*_🥭🌴आंबा, नारळ, सुपारी,आणि काजू साठी अत्यंत गरजेची असणारी उत्पादने_*

*🎋🌴🌾 Maharashtra agro fertilizer and chemicals* 🎋🌴🌾
*kolhapur*

*_👉डायरेक्ट फॅक्टरी दरांमध्ये, उपलब्ध._*
*_👉मधल्या कुठल्याच मेडीयटरचा समावेश नसल्यामुळे कमी दरांमध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे सेंद्रीय खत उपलब्ध_*
*_👉 कल्पवृक्ष आणि निंबोळी पावडर संतुलन ऑर्डर नुसार पोहच करण्याची व्यवस्था_*

*🔹जमिनीच्या सुपीकते बरोबरच उत्पन्नात देखील भरघोस वाढ*

*🔸पिकांची उत्तम वाढ*
*🔹 रोग प्रतिकारक शक्ती वाढते*
*🔸जमिनीचा सामू समान ठेवण्यास मदत*
*🔹 पानांचा व फळांचा आकार वाढतो*
*🔸फळे मोठी होणे*
*🔹प्रकाश संश्र्लेशन कार्य वाढवते.*
*🔸निरोगी आणि विषमुक्त पिके*

*👉आजच संपर्क करा*

*Maharashta agro fertilizer and chemicals.kolhapur.*

*📲9823857786*
*📲8208657954*

*Advt web link 👇*

———————————————-

 

प्रतिक्रिया व्यक्त करा