कणकवली :
कणकवली शहरातील प. पू. चित्स्वरुप फलाहारी महाराज रघुपतीधाम आश्रमाचा (श्रीराम मंदिर ) वास्तूशांती व कलशारोहण सोहळा गुरुवार १ जूनला होणार आहे. यानिमित्त ३१ में व १ जून रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. बुधवार ३१ मे रोजी सकाळी ८ वा. श्री रामप्रभूंवरती अभिषेक, प. पू. भालचंद्र महाराज यांच्या पादुकांवर अभिषेक, सायं. ६ वा. फलाहारी महाराज यांचे कणकवली आगमन, ६.१५ वा. फलाहारी महाराज यांची कणकवली मुख्य चौक ते रघुपतीधाम आश्रमापर्यंत मिरवणूक, रात्री ९ वा. आरती व महाप्रसाद गुरुवार १ जून रोजी सकाळी ६ वा. महर्षी श्री भालचंद्र महाराज भजन मंडळ, शांतीधाम आश्रम लोणावळातर्फे भूपाळीसंग्रह, काकड आरती, मंगलारती, सकाळी ८ वा. पासून श्री गणेशमूर्तीवर अभिषेक, फलाहारी महाराज यांची पाद्यपूजा, ९ वा. श्री स्वयंभू मंदिर ते प. पू. चित्स्वरुप फलाहारी महाराज रघुपतीधाम आश्रमापर्यंत कलश मिरवणूक, १० वा. धार्मिक विधी, वास्तूशांती, श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापणा, प्रोक्षण विधी, प. पू. चित्स्वरूप फलाहारी महाराज रघुपतीधाम आश्रमावर कलशारोहण, प. पू. चित्स्वरुप फलाहारी महाराज यांच्या निवासस्थानाची वास्तूशांती, दुपारी १२ वा. जानवली येथील भजनीबुवा उदय राणे यांचे भजन, १ वा. आरती व महाप्रसाद, सायं. ५ वा. महर्षी भालचंद्र महाराज भजन मंडळ शांतीधाम आश्रम लोणावळा यांचे भजन, ७.३० वा. हरकुळ बुद्रुक येथील पांडुरंग करंबळेकर व त्यांच्या सहकाऱ्यांचा गीतरामायण कार्यक्रम होईल. रात्री १० वा. आरती व महाप्रसाद. कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प. पू. चित्स्वरुप फलाहारी महाराज रघुपतीधाम आश्रमातर्फे करण्यात आले आहे.