वेंगुर्ले तालुक्याचा बारावी परिक्षेचा निकाल ९९.६३% लागला असून प्रथम क्रमांक तालुक्याने मिळवला आहे. बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाची सायन्स विभागाची सारीका कुमारी सरोज यादव ही ९१.८३ %गुण मिळवून तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळाल्याबद्दल वेंगुर्ले शहरातील गवळीवाडा येथील तीच्या निवासस्थानी जाऊन नगराध्यक्ष राजन गिरप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी तिचे आईवडील व कुटुंबीय उपस्थित होते. तसेच खर्डेकर महाविद्यालयाची वाणिज्य शाखेची कु.पुर्वा रामचंद्र करंगूटकर हीने ८७.५० % गुण मिळवून महाविद्यालयात द्वितीय व तालुक्यात सातवी आल्याबद्दल शहरातील गाडीअड्डा येथील निवासस्थानी जाऊन महीला मोर्चाच्या वृंदा गवंडळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच खर्डेकर महाविद्यालयाची विज्ञान शाखेची कु.मिताली चंद्रशेखर कोयंडे हीने ८६.५० % गुण मिळवून महाविद्यालयात तृतीय व तालुक्यात नववी आल्याबद्दल तिचा सत्कार तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच खर्डेकर महाविद्यालयाची कला शाखेची कु.सानिका अमोल वरसकर हीने ८५.३३ % गुण मिळवून प्रथम येण्याचा मान मिळाल्याबद्दल जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांच्या हस्ते भटवाडी येथील तिच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करण्यात आला. तसेच खर्डेकर महाविद्यालयाची कला शाखेची कु.ईशा तुषार भोसले हीने ७६.१७% गुण मिळवून महाविद्यालयात तृतीय क्रमांक मिळविल्याबद्दल भोसलेवाडी येथील तिच्या निवासस्थानी जाऊन तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.