You are currently viewing भोसले पॉलिटेक्निकच्या 35 विद्यार्थ्यांची बजाज ऑटोमध्ये (Bajaj Auto) यशस्वी निवड..

भोसले पॉलिटेक्निकच्या 35 विद्यार्थ्यांची बजाज ऑटोमध्ये (Bajaj Auto) यशस्वी निवड..

सावंतवाडी

येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकच्या तृतीय वर्ष मेकॅनिकल विभागाच्या 35 विद्यार्थ्यांची बजाज ऑटो लिमिटेडमध्ये कॅम्पस इंटरव्हयूद्वारे निवड करण्यात आली. टू व्हीलर व थ्री व्हीलर उत्पादनातील आघाडीची कंपनी बजाज ऑटोतर्फे हे इंटरव्हयू आयोजित करण्यात आले होते._
_पुण्याजवळील आकुर्डी येथील उत्पादन प्रकल्पासाठी ही निवड झाली असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले व प्राचार्य गजानन भोसले यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या._

प्रतिक्रिया व्यक्त करा