You are currently viewing सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे वंदेभारत एक्सप्रेसला थांबा द्या…

सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे वंदेभारत एक्सप्रेसला थांबा द्या…

खासदार सुप्रियाताई सुळे यांनी लक्ष घालण्याची अर्चना घारे यांची मागणी.

सावंतवाडी

सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे मुंबई – गोवा वंदेभारत एक्सप्रेसला थांबा मिळावा तसेच सावंतवाडी टर्मिनसच्या रखडलेल्या कामात लक्ष घालण्याची मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्षा अर्चना घारे यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याकडे केली आहे.

सी.एस.एम.टी ते मडगाव या मार्गावर नव्याने वंदे भारत एक्सप्रेस सुरू होत आहे.कोकण रेल्वेच्या वतीने सुरू करण्यात येणाऱ्या या वंदे भारत एक्सप्रेसमुळे मुंबई ते गोवा हा प्रवास अवघ्या ७ तासात पूर्ण करता येणार आहे. या वंदे भारत एक्सप्रेसला ठाणे,चिपळूण ,रत्नागिरी व कुडाळ हेच थांबे देण्यात आले आहेत. मात्र सावंतवाडी सारख्या तळकोकणातील महत्त्वाच्या स्थानकावर मात्र या गाडीला थांबा देण्यात आलेला नाही.

खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ही बाब आदरणीय रेल्वेमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिल्यास सावंतवाडी परिसरातील नागरिकांची होणारी गैरसोय टळणार आहे.तसेच सावंतवाडी हे या रेल्वे मार्गातील प्रमुख स्टेशन असून, परिसरातील पर्यटन स्थळाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे.परंतु सावंतवाडी येथील रेल्वे टर्मिनसचे काम गेल्या ५-६ वर्षांपासून प्रलंबित आहे.तसेच टर्मिनस 2 चे विस्तारीकरणाचे काम देखील प्रलंबित आहे.परिणामी या मार्गावर धावणाऱ्या २५-३० रेल्वे गाड्यांपैकी अवघ्या ९-१० गाड्या सध्या येथे थांबत आहे यामुळे लांबचा प्रवाशांची संख्या कमी होत असून स्थानकाचा दर्जा देखील कमी होण्याची भीती आहे. तरी संबंधित प्रश्नाबाबत आपण सन्माननीय रेल्वे मंत्र्यांना समवेत चर्चा केल्यास सावंतवाडी रेल्वे स्टेशनचे काम पुन्हा पूर्ववत सुरू होऊ शकेल व सावंतवाडी परिसरातील नागरिकांची, पर्यटकांची मोठी गैरसोय दूर होईल , अशी मागणी देखील केली आहे.

यावेळी बोलताना  खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,” सावंतवाडी रेल्वे स्टेशनचे टर्मिनल दुरुस्तीचे काम तसेच वंदे भारत एक्सप्रेसला थांबा मिळण्याची मागणी हे दोन्ही अत्यंत आवश्यक व तातडीचे कामे आहेत. याबाबत आपण स्वतः सन्माननीय रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असून लवकरच सावंतवाडी परिसरातील नागरिकांना दिलासा मिळावा मिळण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे”.

प्रतिक्रिया व्यक्त करा