बापू नेरुळकर यांचे दुःखद निधन
ही बातमी कानावर आली आणि थोडावेळ यावर विश्वासच बसत नव्हता. माझे बाबा गणपत नारायण सावंत यांचे खास मित्र. माझ्या लहानपणापासून त्यांना जवळून पाहण्याची संधी मला मिळाली . एक भारदस्त व्यक्तिमत्व जवळून पाहण्याचे भाग्य मला मिळाले. त्यांचे विचार खूपच प्रभावी आणि समाजाला दिशा देणारे होते. महिला दिन कार्यक्रमाच्या वेळी तसेच समाज केंद्र उद्घाटन कार्यक्रमासाठी बापू उपस्थित राहिले होते. त्यांनी केलेले मार्गदर्शन मला आज देखील लक्षात आहे. एक वटवृक्षा सारखा माणूस आज आपल्यातून हरपला , याच मनापासून दुःख वाटते . आपल्या गावातील प्रतिभाशाली आणि थोर विचारांची माणसे यात प्रमुख्याने बापू नेरूरकर, बाबा नाडकर्णी, बाबा पटेल यांनी सर्वसामान्य लोकांच्या सोबत राहून गावाच्या विकासासाठी जे काम केले ते खरोखरच खूपच मोलाचे आहे . हिमालया सारखी प्रचंड इच्छाशक्ती आणि स्वकर्तृत्वावर त्यांनी जनमानसात आपली ठळक अशी ओळख निर्माण केली. ही माणसे म्हणजे खरोखरच गावाची एक शान होती .
त्यांच्या आत्म्याला निरंतर शांतता मिळू दे अशी परमेश्वराकडे मी प्रार्थना करतो