मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
लालबाग, परळ, प्रभादेवी, वरळी, दादर या परिसरात शनिवारी सकाळी ८ ते रविवारी, २८ मे सकाळी १० पर्यंत २६ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुरुस्तीच्या कारणास्तव पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
गळती शोधण्यासाठी संपूर्ण जलवाहिनीचा पुरवठा बंद करावा लागणार आहे. त्यामुळे या ठिकाणी पाणीकपात घेऊन त्यानंतर नेमकी गळती शोधून दुरुस्ती पूर्ण करण्यात येईल. सध्या गळती शोधण्यासाठीचे प्राथमिक काम सुरू करण्यात आल्याची माहिती जलअभियंता विभागाने दिली आहे.
*जी दक्षिणमध्ये हे विभाग प्रभावित*
डिलाईल रोड बीडीडी, संपूर्ण प्रभादेवी परिसर, जनता वसाहत, संपूर्ण लोअर परळ विभाग, पांडुरंग बुधकर मार्ग, सेनापती बापट मार्ग, गणपतराव कदम मार्ग, ना. म. जोशी मार्ग, वीर सावरकर मार्ग, एस. एस. अमृतवार या परिसरात दिनांक २७ मे रोजी दुपारी २.३० ते सायंकाळी ७ या कालावधीत पाणीपुरवठा होणार नाही.
*रविवारी येथे पाणीबाणी*
ना. म. जोशी मार्ग, डिलाईल रोड बीडीडी, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग, धोबी घाट, सातरस्ता या परिसरात दिनांक २८ मे रोजी पहाटे ४ ते सकाळी ८ या कालावधीत पाणीपुरवठा होणार नाही.
संपूर्ण माहीम पश्चिम, माटुंगा पश्चिम, दादर पश्चिम विभागात, सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले रोड, काकासाहेब गाडगीळ मार्ग, एल. जे. मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग, मोरी मार्ग, सेनाभवन परिसर, टी. एच. कटारिया मार्ग, कापड बाजार या परिसरात २७ मे रोजी सायंकाळी ४ ते रात्री १० या कालावधीत पाणीपुरवठा होणार नाही.