You are currently viewing जागतिक साकव्य परदेशी समूहाचे पाचवे काव्य संमेलन थाटात संपन्न

जागतिक साकव्य परदेशी समूहाचे पाचवे काव्य संमेलन थाटात संपन्न

*जागतिक साकव्य परदेशी समूहाचे पाचवे काव्य संमेलन थाटात संपन्न*

साहित्य कला व्यक्तीत्व विकास मंच अंतर्गत साकव्य परदेशी परिवार समूहाचे पाचवे आंतरराष्ट्रीय कवी संमेलन बुधवार, दि. २४ मे, २०२३ रोजी आभासी पद्धतीने संपन्न झाले.

साहित्य कला व्यक्तित्व मंचाचे संस्थापक व पालक-चालक, श्री. पांडुरंग कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन अतिशय बहारदार पद्धतीने साजरे झाले. त्यांनी केलेले काव्य रसग्रहणात्मक भाषण सहभागी कवींच्या मनाला भिडले. श्री. पांडुरंग कुलकर्णी यांनी सर्व सहभागी कवी कवयित्रींचे कौतुक केले. दीर्घ कालावधीनंतर परदेशी समूहाचे काव्य संमेलन झाल्याने सगळ्या कवी कवयित्रींनी खूप उत्साहात सहभाग घेतला याचा त्यांना विशेष आनंद झाला.

कार्यक्रमाचे उत्तम नियोजन आणि नेटके सूत्र संचालन केल्याबद्दल समूहाच्या व्यवस्थापिका, तनुजा प्रधान यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.

कवी संमेलनात अश्विनी वैद्य (लंडन, यू.के.), नलिनी कापरे (बोस्टन, अमेरिका), अजीत टिपणीस (ओट्टावा, कॅनडा), अरूणा मुल्हेरकर (मिशिगन, अमेरिका), अमित भोईर (विनीपेग, कॅनडा), शिल्पा तगलपल्लेवार (केमन आयलंड्स), प्राची देशपांडे (कॅलिफोर्निया, अमेरिका), शंतनु कुलकर्णी (पोर्टलँड, ओरेगॉन, अमेरिका), रागिणी रावळीया (दुबई), नितीन बंगाळे (केनिया) आणि डॉ. कमलाकर संखे, (ऑस्ट्रेलिया) अशा विविध देशांमधून आणि खंडांमधून या कवी कवयित्रींनी सहभाग घेतला.
साकव्य समूहाचे जन संपर्क अधिकारी, श्री. विलास कुलकर्णी यांनी या काव्य संमेलनात विशेष उपस्थिती नोंदवली.

या कार्यक्रमाचे पोस्टर श्री. मिलिंद पगारे सर यांनी बनवले. त्याचप्रमाणे या संपूर्ण कार्यक्रमाचे तंत्र समन्वयक म्हणून त्यांनी जबाबदारी पेलली.

परदेशात राहूनही आपल्या माय मराठीशी नाळ जोडून ठेवणाऱ्या साकव्य समूहाच्या कवी कवयित्रींनी अतिशय उत्साहात हे पाचवे काव्य संमेलन यशस्वी केले.

 

*संवाद मीडिया*

*🏟️कृष्णामाई बोअरवेल🏟️*

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*

*📍 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*🛑 प्रोप्रा. : आनंद रामदास*

📲 *संपर्क :*

*9422381263 / 7720842463*

*Advt link*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा