You are currently viewing बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे तायक्वांदो ब्लॅक बेल्ट परीक्षेत यश

बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे तायक्वांदो ब्लॅक बेल्ट परीक्षेत यश

कणकवली :

 

बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूल कणकवलीच्या कु. तनिष्का संदीप सावंत (इ. 8 वी) व कु. कुणाल निलेश नारकर (इ.10 वी) या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम रत्नागिरी येथे दिनांक 21 मे 2023 ते 24 मे 2023 या कालावधीत आयोजित केलेल्या तायक्वांदो ब्लॅक बेल्ट परीक्षेत भरघोस यश संपादन केले आहे. ही परीक्षा तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया च्या वतीने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स ने आयोजित केली होती.

बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूल, कणकवली ही शाळा नेहमीच विद्यार्थ्यांसाठी शालेय अभ्यासक्रमा व्यतिरिक्त संगीत, तायक्वांदो/कराटे, नृत्य या अभ्यासक्रमासाठी विशेष प्रयत्नशील असते. बाह्य उपक्रम व स्पर्धा यात शाळेचे विद्यार्थी सातत्याने यशस्वी होतात. संस्थेच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या संचालिका सौ. सुलेखा राणे, खजिनदार श्री. रमेश राणे, संस्थेचे सदस्य श्री. संदीप सावंत, श्री. विनायक सापळे, श्री अभिजीत सावंत, संस्थेच्या शैक्षणिक उत्कृष्टता संचालक सौ. प्रणाली सावंत, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गीतांजली कुलकर्णी व शिक्षक वृंद उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा