वेंगुर्ले तालुका भाजपा बैठकीत विविध कार्यक्रमाचे नियोजन, ९ वर्ष पुर्ती कार्यक्रम उस्तव म्हणून साजरा करणार – प्रसंन्ना देसाई
वेंगुर्ले
३० मे रोजी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ९ वर्षे पूर्ण होत आहेत . यानिमित्ताने ३० मे ते ३० जुन २०२३ या कालावधीत राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी.नड्डा व प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात ” *विशेष जनसंपर्क अभियान* ” संपन्न होणार असून , जिल्हा – मंडल – शक्तीकेंद्र व बुथ पातळीवर वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत .
या अभियानाची नियोजन सभा जिल्हा सरचिटणीस व अभियानाचे जिल्हा सहसंयोजक प्रसंन्ना देसाई व प्रदेश का.का.सदस्य शरदजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका कार्यालय , वेंगुर्ले येथे संपन्न झाली . यावेळी तालुक्यातील २१ ही शक्तीकेंद्रावर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले . तसेच *संपर्क ते समर्थन* या अंतर्गत तालुक्यातील प्रमुख घटकातील प्रभावशाली व्यक्ती , खेळाडु , कलाकार , उद्योजक , हुतात्मा सैनिक तसेच अन्य कुटुंबाशी संपर्क करण्यासाठी यादी करण्यात आली . तसेच बुद्धीवंतांचे संमेलनासाठी तालुक्यातील बुद्धीवंतांची यादी बनविण्यात आली . तसेच जेष्ठ कार्यकर्त्यांचे संमेलन , संयुक्त मोर्चा संमेलन , लाभार्थी संमेलन इत्यादी होणाऱ्या कार्यक्रमा बाबत चर्चा करुन प्रमुख पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली .
यावेळी मार्गदर्शन करताना प्रसंन्ना देसाई म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींच्या नेतृत्वात भारताची प्रतिष्ठा जगभरात उंचावत असून भारताचा सांस्कृतिक वारसा जागतिक पातळीवर पोहचला आहे . देशातील पायाभूत सुविधा विकासाचे जाळे अधिक मजबूत करून आधुनिक भारताचे स्वप्न प्रत्यक्षात साकारत आहे . या अभियानात आपल्या तालुक्यातील बुथ स्तरावर व्यापक जनसंपर्क , लाभार्थी संपर्क , समाजातील विविध घटकांशी संपर्क , जेष्ठ कार्यकर्त्यांशी संपर्क अशा कार्यक्रमातून मोदी सरकारच्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजना या अभियानातुन सामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले .
यावेळी तालुकास्तरीय कमीटी सदस्यांना शक्तीकेंद्र निहाय जबाबदारी देण्यात आली .
यावेळी तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर , नगराध्यक्ष राजन गिरप , ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर व बाबली वायंगणकर , जिल्हा उपाध्यक्ष अँड. सुषमा खानोलकर , जिल्हा चिटणीस निलेश सामंत , जि.का.का.सदस्य वसंत तांडेल व साईप्रसाद नाईक , युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रसाद पाटकर , युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रणव वा्यंगणकर , किसान मोर्चाचे बाळु प्रभु , नगरसेवक नागेश उर्फ पिंटु गावडे व प्रशांत आपटे , खरेदी विक्री संघ चेअरमन ज्ञानेश्वर केळजी , सोशल मिडीयाचे श्रीकृष्ण उर्फ राजु परब , ता.उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे , ता.चिटणीस जयंत मोंडकर , *शक्तीकेंद्र प्रमुख* – सुधीर गावडे – विजय बागकर – गणेश गावडे – रुपेश राणे , अणसुर सरपंच सत्यविजय गावडे , *बुथ प्रमुख* — शेखर काणेकर – रविंद्र शिरसाठ – श्रीकृष्ण धानजी – संदिप देसाई – बाळु वस्त , समिर नाईक , वेतोरे सो.सा.चेअरमन विजय नाईक , वेतोरे मा.सरपंचा सुमीत्रा गावडे , अनिल नाईक , प्रकाश गावडे , शामसुंदर शिरोडकर , भाग्यश्री राऊळ , क्रांती गावडे , जयश्री गावडे , योगेश गावडे , संजय गावडे , कोमल गावडे , उर्मिला धुरी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते .