सावंतवाडी
शहरातील भाजी मंडईसह इतर विकास कामाची भुमिपूजन येथे ३० तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली.दरम्यान येथे आवठडा भरात कॅबिनेट बैठकी मध्ये प्रस्ताव ठेवण्यात येणार असून त्याला मंजूर मिळाल्यास तात्काळ काम सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.ते सावंतवाडीत आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी केसरकर म्हणाले मुख्यमंत्री यांनी शहराला भरीव निधी दिल्याने त्याचा भव्य नागरिक सत्कार करण्यात येणार आहे असल्याचेही केसरकर यांनी यावेळी सांगितल.तसेच शहरातील जे काम रडखलीत त्या कामाना गती देखील देण्यात येणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.
केसरकर म्हणाले शहरातील भाजी मंडई मार्केटच भुमिपूजन झाल्या नंतर लगेच तिन चार दिवसात कामाला सुरूवात होणार आहे. व्यापाऱ्यांना कोणतीच अडचण होणार नाही याची दक्षता घेऊनच आम्ही सर्व करणार असल्याचे केसरकर यांनी यावेळी सांगितले. तसेच शासन आपल्या दारी उपक्रमाचे शुभारंभ होण्यापासून यावेळी लाभार्थ्यांना त्यांच्या हस्ते पत्र देण्यात येणार असल्याचे ही केसरकार यांनी सांगितले. यावेळी अशोक दळवी,बबन राणें,राजन पोकळे आदी उपस्थित होते