You are currently viewing ब्रिज अकॅडमीच्या 19 विद्यार्थ्यांची पोलीस पदी निवड

ब्रिज अकॅडमीच्या 19 विद्यार्थ्यांची पोलीस पदी निवड

ब्रिज अकॅडमीच्या 19 विद्यार्थ्यांची पोलीस पदी निवड

इचलकरंजी : प्रतिनिधी

प्रचंड कष्ट आणि मेहनतीतून तुम्हाला आता पोलिसांची वर्दी मिळणार आहे. या वर्दीचा वापर समाजात पोलिसांची प्रतिमा अधिक चांगली करण्यासाठी प्रयत्न करा ,असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास अडसूळ यांनी केले.

येथील ब्रिज अकॅडमीच्या 19 विद्यार्थ्यांची पोलीस पदी निवड झाली. त्यानिमित्त ब्रिज अकॅडमी
संस्थेच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आनंदराव कौंदाडे होते.या कार्यक्रमास अमरावतीचे
सहाय्यक पोलीस निरीक्षक इम्रान नायकवडी, आनंदराव कौंदाडे, प्रा.डॉ. अमर कांबळे, इचलकरंजी नगरपालिकेच्या टागोर वाचनालयाच्या अधीक्षक बेबी नदाफ, जेष्ठ पत्रकार संजय खूळ यांची होती.
येथील ब्रिज अकॅडमीच्या वतीने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र चालवले जाते. नुकताच झालेल्या पोलिस दलाच्या भरतीत
एकाच वेळी या अकॅडमीच्या
तब्बल 19 विद्यार्थ्यांची पोलीस पदावर निवड झाली. अकॅडमीसाठी ही गौरवपूर्ण व अभिमानास्पद बाब असल्याने या सर्व विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.सामान्य कुटुंबातून अत्यंत कष्टाने आणि परिश्रमाने निवड झालेल्या या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा एक स्नेहपूर्ण सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या सत्काराने त्यांचे कुटुंबीयही भारावून गेले.
या कार्यक्रमात राजू पाटील, अजिंक्य बंडगर, सलोनी कांबळे, श्रेयशी कवठेकर, प्रतीक सीतापराव, सुनील पुजारी, सुप्रिया चव्हाण, सौरभ माणगावे, महेश पाटील, गायत्री सासणे, अविनाश कोष्टी, शामबाला पांडव, सौजन्य माळी, पुनम मंगसुळे, अजित खोत, सुप्रिया चव्हाण, अनिता चौगुले, सुहास ताराबंळे व धनश्री कसेकर या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या केंद्रातील अन्य प्रशिक्षकांचाही मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच अब्दुल कलाम अकॅडमीच्या वतीने प्रा.संदीप राणे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी केंद्राचे संचालक प्रा संदीप राणे यांनी स्वागत आणि प्रास्ताविकात विद्यार्थ्यांच्या या यशाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. यापुढेही या संस्थेच्या वतीने अशीच यशस्वी भरारी घेतली जाईल , असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी बोलताना प्रा.अमर कांबळे यांनी यांच्या जिद्दीचे कौतुक करून निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक इम्रान नायकवडी यांनी पोलीस दलातील आपले अनेक अनुभव सांगितले. इचलकरंजी शहरात अत्यंत कष्ट करीत त्यांनी मिळवलेले यश आणि त्यानंतर या पदाचा वापर करून केलेले कार्य याचा आढावाही त्यांनी घेतला. मुंबईत काम करताना आपण सर्वांना भावाप्रमाणे मदत करू असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. विद्यार्थ्यांनी फक्त या यशावर न थांबता या पुढीलही परीक्षा देऊन मोठे अधिकारी बनावे ,असे आवाहन बेबी नदाफ यांनी केले.
यावेळी अजिंक्य बंडगर, राजू पाटील आणि सुनील पुजारी या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन विजय काळे यांनी तर आभार प्रदर्शन सागर कवडे यांनी केले. येथील समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास विद्यार्थी ,पालक व प्रशिक्षक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten + twenty =