इचलकरंजी/प्रतिनिधी :
मागील आठ महिन्यांपासून रिक्त असलेल्या येथील पोलिस उपअधिक्षक (डीवायएसपी) पदी समीरसिंग द्वारकोजीराव साळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. साळवे हे नाशिक ग्रामीण मनमाड उपविभाग येथे कार्यरत होते.
इचलकरंजी शहरातील पोलिस उपअधिक्षक पदावर बाबुराव महामुनी हे कार्यरत होते. नोव्हेंबर 2022 मध्ये त्यांची पदोन्नतीवर बदली झाली. त्यानंतर आजपर्यंत हे पद रिक्तच होते. जयसिंगपूरचे पोलिस उपअधिक्षक रामेश्वर वैंजणे यांच्याकडे या पदाचा पदभार सोपविण्यात आला होता. आठ महिन्यांपासून हे पद रिक्तच असल्याने त्याठिकाणी कोणाची वर्णी लागणार याचीच उत्सुकता सर्वांना लागून राहिली होती.त्यांच्याकडून गुन्हेगारी बरोबर अवैध व्यवसायाचा समुळ नायनाट व्हावा ,अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.