आयुष्याचे गाणे

*जागतिक साहित्य कला वक्तृत्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री अंजली दीक्षित लिखित अप्रतिम लेख*

*आयुष्याचे गाणे*

इतक्यात मानावे कसे आभार आयुष्या तुझे
आता कुठे कळले मनोव्यापार आयुष्या तुझे

माझ्याच एका गजलेतील हा मतला आहे.गोष्टी चांगल्या घडू देत किंवा वाईट, त्या आपल्या आयुष्यावर स्वतःचा एक वेगळाच ठसा उमटवून जात असतात. अवीट गोडीच्या सुखद क्षणांची आपण जन्मभर वाट बघत असतो. या सुखाच्या मोहाला कधीही अंत नसतो. एक सूख उपभोगून संपलं की थोड्या काळाने परत दुसरं सूख हवं असतं. सुखाची लालसा ही ययाती सारखी असते, ती तुम्हाला थांबू देत नाही आणि दुःखाची तर तर्हाच वेगळी. ते तुम्हाला सोडत नाही… अगदी वेताळाप्रमाणे तुमचा पिच्छा पुरवते. तुम्ही कितीही त्याला मात द्यायचा प्रयत्न करा ते लपत छपत तुमचा पाठलाग करत अगदी अचानक तुमच्या पुढ्यात येऊन उभे राहते. तुमचं संपूर्ण जग मग त्या काळ्या छायेखाली झाकोळून जाऊ लागते. दुःखाला अंजारत गोंजारत येणारा प्रत्येक दिवस आपण साजरा करायला शिकतो ते याच आशेवर की आज ना उद्या हेही दिवस सरतील आणि सुखाचे क्षण नक्की येतील. या सुखदुःखाच्या हिंदोळ्यांचा मनमुराद आनंद घेत जगणे म्हणजेच आयुष्याचे गाणे होणे. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेत भल्याबुऱ्या क्षणांना तितक्याच उत्कटतेने सामोरे जात त्या क्षणांना फक्त साक्षी राहून जेव्हा तटस्थपणे बघायला शिकतो तेव्हा दुःख हे दुःख राहत नाही आणि सुखानं आपण हुरळूनही जात नाही. आपल्याला कळतही नसतं की आपली परीक्षा घेणारे दुसरे तिसरे बाहेरचे कोणी नसून ते तर आपले स्वतःचेच आयुष्य असते. हो, खरेच आहे हे. आपलेच आयुष्य क्षणाक्षणाला रूप बदलून वेगवेगळ्या पातळ्यांवर आपल्याला आजमावत असते. कधी विचार करून बघा म्हणजे तुम्हालाही हे पटेल. एका वळणावरची एक परीक्षा पार पाडलीत की तुमच्यासमोर पुन्हा दोन वाटा दिसू लागतात. पर्याय निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला दिलेलं असतं. योग्य वाट निवडलीत तरीसुद्धा पुढची प्रश्नपत्रिका कुठल्या तरी वळणावर हातात पडतेच आणि अयोग्य वाट निवडली तरीही प्रश्नांचा ससेमिरा चुकत नाहीच. रोज नवीन पाठ, रोज नवीन प्रश्न, रोज नवीन उत्तरं…. आयुष्याच्या पाठशाळेत पेपर फुटीचा प्रश्नच नसतो. इथे प्रत्येकाला वेगळी प्रश्नपत्रिका सोडवायला मिळते. त्यामुळे कॉपी करण्याचाही पर्याय उरत नाही. पण तरीही आयुष्य एवढं उदार आहे की ते तुम्हाला कुणालाही उत्तरं विचारण्याची मुभा देते, एका ठराविक मर्यादेत. पण निर्णय अर्थात उत्तरपत्रिका आपल्यालाच लिहायची असते आणि गंमत म्हणजे इथे तुम्ही निकालाच्या निर्णयाला दुसऱ्या व्यक्तीला जबाबदारही धरू शकता. पण वाईट बाजू अशी की तरीही निर्णयाचे बरे वाईट परिणाम भोगायला मात्र आपल्यालाच लागतात. कसं आहे ना प्रत्येकाला मिळालेलं आयुष्य स्वतंत्र आहे पण आपण एकमेकांवर किती विसंबून आहोत हे पहा. नवरा बायकोवर, बायको नवऱ्यावर, मुलं पालकांवर, पालक मुलांवर, आपण सगळे समाजावर, समाज आपल्यावर…. अशी असंख्य नाती एकमेकांशिवाय पूर्णत्वाला जाऊ शकत नाहीत. ती परस्परावलंबी असण्यापेक्षा परस्परपूरक असणं कधीही जास्त चांगलं. अवलंबित्व आलं की अधिकार आला. त्याबरोबरीने स्वार्थ आला. स्वार्थाचा शिरकाव होताच इच्छांचे साम्राज्य सुरू होते ज्याचा कधीही अस्तं नसतो. म्हणूनच परस्पर पूरक असणं हे सगळ्याच नात्यांसाठी योग्य ठरतं. त्यांनं व्यक्तीला स्वतःची ओळख निर्माण करण्यात फायदाच होतो आणि कुठलीच नाती मग फक्त टाळता येत नाहीत म्हणून मिरवायला लागत नाहीत. परस्पर पूरकत्व ही सहज साध्य गोष्ट नसली तरी अशक्य ही अजिबात नाही. थोडं आयुष्याचं चिंतन, थोडा स्वतःशी संवाद साधत राहणं आणि थोडं इतरांच्या नजरेतून पाहायला शिकणे, त्यांच्याही भूमिकेचा विचार करणे… बस इतकं जरी करता आलं तरी एकमेकांच्या आयुष्याला आपण निश्चितच बहारदार गाण्याची एक सुंदर मैफिल बनवू शकतो. जगा आणि जगू द्या हे तत्वच सर्वश्रेष्ठ तत्व आहे. आयुष्याचं गाणं करता येणे म्हणजे अजून दुसरं असतं तरी काय?

©®अंजली दीक्षित

*ऑफर… ऑफर….. ऑफर….💃💃*

*_कुडाळ शहरातील छत्रपती शिवाजी पार्क गृह प्रकल्पात ग्राहकांना मिळणार ” ऑफर”…_*

*_१६ लाखात १ बीएचके, तर २७ लाखात २ बीएचके फ्लॅट; दुकान गाळा फक्त १० लाखात…_*
ऑफर*

*🥳पुन्हा एकदा कुडाळ शहरात १६ लाखात फ्लॅट घेण्याची संधी…!💃*

*_🥰आता आमची नवी ओळख “छत्रपती शिवाजी पार्क”…🥰_*

*ग्राहकांच्या उत्स्फूर्त😍 प्रतिसादानंतर आम्ही घेऊन आलो🤩 आहोत…! खास *दसरा🎊 ऑफर…!😍🥳💃*

*मंदी नही…! 😍ये संधी है…!🤩*

*_🏡 छत्रपती शिवाजी पार्क🌴_*
*_🌴गृहप्रकल्प-कुडाळ🏡_*

*👉 घेऊन आले आहेत…!स्मार्टसिटीच्या 🛣️ वाटेवर असलेल्या कुडाळात मध्यवर्ती भागात तयार ताबा 1BHK फ्लॅट फक्त १६ लाखात, 2 BHK फ्लॅट फक्त २७ लाखात तोही GST सह, तर १० लाखात मिळावा दुकान गाळा…!*

👉 *_पहिल्या पाच ग्राहकांना ही संधी…😍🥳🤩_*

*आठ बिल्डिंगच्या🏬 भव्य-दिव्य गृह प्रकल्पा 🏡 सोबत १५ हजार स्क्वेअर फूट गार्डन🏕️,गणेश मंदिर🛕,स्विमिंग पूल🗾,क्लब हाउस🏸,जिम 💪आणि प्रशस्त पार्किंगची🚘 सुविधा…!*💃

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी २५० ची मेगा टाऊनशिप…🏬*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून चालत फक्त ३ मिनिटांच्या अंतरावर…🚶‍♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर…🚆*
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*

*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃‍♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️

*🛑 मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*

*🏡 आमचा पत्ता:- साईट शिवाजी पार्क,सत्कार हॉटेल रोड,जुना बस स्टँड समोर,कुडाळ*

*📲 संपर्क :- **९४२२३७९३९९*
*९४२२०६५१८१*
*९४०४७५१५००*
_______________________

प्रतिक्रिया व्यक्त करा