भारतातून ८६१ वी रँक प्राप्त ; सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव
कणकवली
नांदोस चव्हाणवाडी येथील सुपुत्र तुषार दीपक पवार (वय २४) यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग यूपीएससी परीक्षेत यश संपादन केले असून संपूर्ण भारतातून ८६१ वी रँक प्राप्त केली आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तुषार हा सामान्य कुटुंबातून शिक्षण घेत या यशापर्यंत पोचला आहे. त्याचे वडील दीपक पवार हे कणकवली येथील खरेदी विक्री संघात काम करतात तर आई घरी शिवणकाम करते. त्यामुळे तुषार यांचे १२ पर्यत शिक्षण कणकवली येथे झाले. त्यानंतर पुणे येथे पुढील शिक्षण पूर्ण करत तुषार हे यूपीएससी अभ्यास करत. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत त्याने यशाला गवसणी घातली. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच चर्मकार समाज उन्नती मंडळाचे वतीने त्याचे विशेष कौतुक करण्यात आले आहे