You are currently viewing फोंडाघाटचे विनायक कुशे यांनी साकारले नारायण राणे यांचे पोट्रेट

फोंडाघाटचे विनायक कुशे यांनी साकारले नारायण राणे यांचे पोट्रेट

फोंडाघाट

फोंडाघाटचे विनायक कुशे यांनी खासदार मा.नारायण राणे यांचे पोट्रेट साकारले आहे. विनायकचे दळवी आर्ट कोल्हापुर मधुन शिक्षण सुरू आहे. विनायक ने नारायण राणे यांचे चित्र हार्ड ड्राॅईंग बोर्डवर आॅईल कलरने साकारले आहे. आमदार नितेश राणेंनी विनायक चे फोन लावुन कौतुक केले. नारायण राणे दौऱ्याहून आल्यावर नितेश राणे हे विनायक चा विषय दादांकडे सांगणार आहेत. त्याचे १ वर्षाचे शिक्षण शिल्लक असुन त्यानंतर याच क्षेत्रात काम करण्याची इच्छा विनायक ने व्यक्त केली आहे फोंडाघाट भाजी व्यापारी उमेश कुशे यांचा विनायक मुलगा आहे. सर्व क्षेत्रातुन त्याचे कौतुक होत असून मी तुझ्या पाठीशी आहे, आपण भेटू, असे त्याला सांगीतले.

दिपावली सुट्टीत त्याच्या ५०० रेखाटलेल्या चित्राचे कणकवलीत प्रदर्शन भरविणार असल्याचे त्यांनी सांगितले व्यक्तीला समोर बसवुन विनायक चित्र रेखाटणार आहे. विनायकच्या पुढील वाटचालीस सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 5 =