इचलकरंजीत माकपची ब्रिजभूषण सिंग यांच्यावर कारवाईसाठी निदर्शने
इचलकरंजी: प्रतिनिधी
येथील माकपच्या वतीने अखिल भारतीय कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक शोषण प्रकरणी अटकेची कारवाई करावी ,या मागणीसाठी मलाबादे चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली.यावेळी निदर्शकांनी जोरदार घोषणाबाजी करत जनता चौक परिसर दणाणून सोडला.
अखिल भारतीय कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभुषण सिंग यांनी देशातील अनेक कुस्तीगीर महिलांवर केलेल्या लैंगिक शोषणाच्या निषेधार्थ दिल्ली येथील जंतरमंतर वर 23 एप्रिल पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. ते धरणे आंदोलन आजही चालू आहे. मात्र मोदी सरकारने आजूनही ब्रिजभुषण सिंग यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. तसेच या महिला कुस्तीपटूंचे म्हणणेसुध्दा ऐकून घेतलेले नाही.तसेच खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्यावरसुध्दा गुन्हाही दाखल केला नाही.गेल्या सहा महिन्यांपूर्वी या महिला कुस्तीगीरांनी असेच आंदोलन केले होते. त्यावेळी सरकारने या तक्रारीबाबत एका कमिटीचे गठण केले होते. मात्र , त्या समितीने साधी
चौकशीही केली नाही आणि रिपोर्टही दिला नाही.विशेष म्हणजे त्या कमिटीवर भाजप आणि ब्रिजभुषण सिंग याने दबाव आणून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता.त्यामुळे या महिला कुस्तीगीरांनी पुन्हा दिल्लीत जंतरमंतर वर आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला आतापर्यंत सर्वच पक्ष आणि संघटनांनी पाठिंबा दिला आहे. मात्र मोदी सरकार आणि योगी सरकार या गंभीर प्रकरणाकडे
लक्ष दयायला तयार नाही.
याच्या निषेधार्थ आज देशभर कुस्तीगीर महिलांवर लैंगिक शोषण करणारे भाजपचे खासदार आणि भारतीय कुस्तीगीर संघटनेचा अध्यक्ष ब्रिजभुषण सिंग यांना अटक करावी तसेच भाजपने अशा लंपट खासदारांचा राजीनामा घ्यावा, त्यांच्यावर पोक्सो कायदयांतर्गत गुन्हा दाखल करण्याची कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.याच
कारवाईच्या मागणीसाठी इचलकरंजी येथे मलाबादे चौकात माकपच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.यावेळी निदर्शकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. यावेळी काॅम्रेड भरमा कांबळे, पार्वती जाधव यांनी आपल्या भाषणात
खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्यावर कारवाई न करणा-या मोदी सरकारवर जोरदार टीका केली.
या निदर्शनामध्ये सदा मलाबादे, दत्ता माने,भाऊसो कसबे, जीवन कोळी, धनाजी जाधव, आनंदा वाघमारे, सुभाष कांबळे, पार्वती म्हेत्रे, हणमंत मुतूर,नूरमहमद बेळकुडे, संजय टेके,मनोहर ढवळे,पार्वती जाधव,अमित कोरवी, राजू साठे, नबी शेख,बळवंत टकले,यासीन भोई यांच्यासह पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Marksvadi existence is zero. If lady resellers are victims then they should go to court. Why they are wasting time in agitations.