कुडाळ :
कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. आफ्रिन करोल यांनी सोमवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.
दरम्यान, सौ. आफ्रिन करोल यांच्याशी संवाद साधला असता, त्या म्हणाल्या काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार नगराध्यक्ष पदाचा सव्वा वर्षाचा कालावधी आपल्याला होता. 14 मे ला हा कालावधी संपला. त्यामुळे आपण काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.
आता पुढच्या सव्वा वर्षासाठी काँग्रेसच्या अक्षता खटावकर यांची नगराध्यक्षापदी वर्णी लागणार असल्याचे त्या म्हणाल्या, जिल्हाधिकारी यांच्याकडे मी राजीनामा सादर केला आहे. मात्र तो अजून मंजूर झालेला नाही.
नगराध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यामागच वेगळं कारण काही नाही. कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसच्या दोन नगरसेविका निवडून आल्या होत्या. पहिली संधी मला मिळाली. पक्षाच्या फॉर्मुल्याप्रमाणे पुढच्या सव्वा वर्षासाठी अक्षता खटावकर यांना संधी मिळणार, त्यानंतर पुढच्या अडीच वर्षासाठी शिवसेनेला संधी मिळेल असे त्यांनी स्पष्ट केले.