अत्याधुनिक अशा ‘ब्रिलियंट फॅक्टरीमध्ये ‘ मिळणार काम करण्याची संधी
सावंतवाडी
यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक्च्या २१ विद्यार्थ्यांची जनरल इलेक्ट्रिक (GE) या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड करण्यात आली. कंपनीच्या पुणे येथील प्रकल्पासाठी हि निवड झाली असून यामध्ये मेकॅनिकल विभागाच्या दहा तर इलेक्ट्रीकल विभागाच्या अकरा विद्यार्थ्यांचा समावेश आहे._
_जीई कंपनीचा पुणे येथील प्रकल्प अतिशय अत्याधुनिक असून त्याला ‘ब्रिलीयंट फॅक्टरी’ असे संबोधण्यात येते. याठिकाणी जेट इंजिन, रेल्वे इंजिनपासून ते विंड टर्बाईन्स, ऑईल, गॅस व अॅग्रिकल्चर इंडस्ट्रीसाठी लागणाऱ्या सुट्या भागांची निर्मिती करण्यात येते._
_निवड झालेले विद्यार्थी, मेकॅनिकल विभाग – अक्षय झोरे, हिर्लोक ता.कुडाळ, हेमंत आसोलकर, बाव ता.कुडाळ, मिलिंद राऊळ, तळवडे ता.सावंतवाडी, मोहीम खान, बांदा ता.सावंतवाडी, नामदेव पायनाईक, आजगाव ता.सावंतवाडी, नरहरी गवळी, कारिवडे ता.सावंतवाडी, राज कळसुलकर, माजगाव ता.सावंतवाडी, सत्यम सावंत, कितवडे ता.आजरा, मनीष राऊळ, मठ ता.वेंगुर्ला, सर्वेश दळवी, विलवडे ता.सावंतवाडी_
_इलेक्ट्रिकल विभाग – आकांक्षा वर्णेकर, ओटवणे ता.सावंतवाडी, कजेतान डिसोझा, वेंगुर्ला, दीक्षा हडकर, सावंतवाडी, दिव्यश्री वरक, निवजे ता.कुडाळ, जयेश देसाई, डेगवे ता.सावंतवाडी, कौशल परब, माणगाव ता.कुडाळ, साहिल गावडे, केर ता.दोडामार्ग, साक्षी धाऊसकर, सासोली ता.दोडामार्ग, स्वानंद कामतेकर, कणकवली, तन्मय राऊळ, नेमळे ता.सावंतवाडी, विवेक कविटकर, कोलगाव ता.सावंतवाडी._
_सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले व प्राचार्य गजानन भोसले यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या._