You are currently viewing काय आहे अध्यात्म?

काय आहे अध्यात्म?

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा.सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर (मिशिगन) लिखित अप्रतिम लेख*

*काय आहे अध्यात्म?*
~~~~~~~~~~~~~~
आजकाल मी पहाते आहे जो उठतो तो अध्यात्माला लागतो आहे.दर शनिवारी न चुकता मारुतीला तेल आणि रुईची माळ घालणारा तरूण वर्ग खूपच वाढला आहे.गणपतीच्या,महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी लागणार्‍या रांगा दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत.त्यातही युवा पिढीची संख्या अधिक.मला नाही आठवत मी शाळा काॅलेजात असताना माझ्या वयाची मुलं मुली आजच्या तरूणाईप्रमाणे नित्य नियमाने कधी कुठल्या देवळात गेल्याचे.हं!कधी आई~बाबां सोबत सणावारी गेले तरच!
हा असा फरक का बरे पडला असावा?दिवसेंदिवस जीवनात वाढत असलेला तणाव हे तर त्याचे कारण नाही?मुलांचं बालपण तर हरवलेलंच आहे. आईच्या गर्भात असतानाच शाळेत,बालवाडीत प्रवेश घेण्यासाठी पालकांची लगबग सुरू होते.छोटी छोटी बालके पाठीवर पुस्तकांचे हे एवढे ओझे घेऊन जाताना आपण पाहतो.स्पर्धा तर विचारूच नका.मुलांच्या परस्परांतील स्पर्धांपेक्षा त्यांच्या पालकांतच स्पर्धा!माझ्या मुलानेच अव्वल क्रमांक मिळविला पाहीजे,माझ्याच मुलाला सर्व पारितोषिके मिळाली पाहीजेत यासाठी शाळेतून आल्यावर त्यांना सतरा प्रकारचे क्लास लावायचे.
मुलांनी खेळायचे कधी हो?
पुढे आजीवन तणावच तणाव!नोकरी,व्यवसाय,वाढती महागाई,रोजचा प्रवास सगळेच अशाश्वत.
अशावेळी अध्यात्माकडे वळणें,मंदिरात जाऊन देवाला प्रदक्षिणा घालणे आणि ईश्वराची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न करणे इतकेच आपल्या हातात आहे.
“करून करून भागले आणि देवपूजेला लागले”. अशी म्हण आहे आपल्याकडे.पण म्हणजे अध्यात्म झाले का?
अध्यात्म याचा शाब्दिक अर्थ आहे स्वतःचे अध्ययन.आत्मिक संशोधन.माझ्या शरीरात जो अविनाशी आत्मा आहे त्याचा अभ्यास म्हणजे अध्यात्म!म्हणजे नेमकं काय?
आपण प्रेम करतो.कुणावर? स्वतःवर.आपल्या या नश्वर देहावर.मग स्वतःलाच विचारतो!”कुठे शोधीसी रामेश्वर अन् कुठे शोधीसी काशी।
ह्रदयातील भगवंत राहीला ह्रदयातून उपाशी।।”
मनात विचारांचे काहूर माजते आणि आपण अस्वस्थ होतो.
आपल्या आतील चेतनेला जागविणे म्हणजेच अध्यात्म!जीवात्मा हे अध्यात्म!
*परम्ं स्वभावः अध्यात्म्ं उच्चते* माणसाचा उत्तम स्वभाव,त्याचे उच्च आचारविचार हेच अध्यात्म!हे साध्य करण्यासाठी ध्यानधारणा,प्राणायाम, योग ही साधने आहेत.मनातील सगळे कुविचार नष्ट करण्यासाठी एकांतात ध्यानस्थ बसणे आणि मन स्वच्छ करणे म्हणजे अध्यात्म!
आत्मस्वरूपात विलीन होणे,संसार,प्रपंचातून विरक्त होणे,लोभ,मोह,मत्सर या षड्रिपूंपासून दूर राहणे ह्या सर्व गोष्टी आपल्यासारख्या सामान्य जनांसाठी अतिशय अवघड आहेत,परंतु एका सामान्य मानवाला मानवतेचा धर्म पाळणे सहज शक्य आहे.
फक्त स्वतःचाच विचार न करता इतरांवर प्रेम करा,मुक्या प्राण्यांवर प्रेम करा,चराचराला आपले म्हणा,भुकेल्याला घास भरवा,आंधळ्यांची काठी व्हा,नेत्रदान करा,रक्तदान करा,जे जे काही कराल ते दुसर्‍याच्या आनंदासाठी करा.
माझ्या मते हीच परमेश्वराची पूजा आहे आणि हेच अध्यात्म आहे.
आज मला हे विचार मांडत असताना माझ्या आजीची खूप आठवण आली.दोन पिढ्यांच्या अंतरामुळे कधी कधी तिने काही उपदेशपर गोष्टी सांगितल्या तर त्यावेळी मला जरा त्रासल्यासारखे होत असे.असेच एकदा ती तिचे मन माझ्याकडे मोकळे करण्याचा प्रयत्न करीत असताना मी तिला एकदम म्हणाले,”जिजी बस कर ना तुझं हे रामायण.नको लक्ष घालूस सगळ्या गोष्टीत,जपमाळ ओढत बस आता.” ती पटकन् उत्तरली,”मला शिकवू नकोस. नुसते हरीनाम घेऊन काही नाही होत.माणसाची सेवा,अडलेल्यास मदत हीच देवपूजा आहे.”
मला वाटतं हेच संस्कार लहानपणापासून रक्तात भिनले गेले आहेत.आज अध्यात्माचा खरा अर्थ मला समजला आहे
संत तुकाराम महाराजांनी म्हटलेच आहे,
*जे का रंजल गांजले ।त्यासी म्हणे जो आपुले।*
*तोचि साधू ओळखावा।देव तेथेचि जाणावा।।*

*अरूणा मुल्हेरकर*
*मिशिगन*

*ऑफर… ऑफर….. ऑफर….💃💃*

*_कुडाळ शहरातील छत्रपती शिवाजी पार्क गृह प्रकल्पात ग्राहकांना मिळणार ” ऑफर”…_*

*_१६ लाखात १ बीएचके, तर २७ लाखात २ बीएचके फ्लॅट; दुकान गाळा फक्त १० लाखात…_*
ऑफर*

*🥳पुन्हा एकदा कुडाळ शहरात १६ लाखात फ्लॅट घेण्याची संधी…!💃*

*_🥰आता आमची नवी ओळख “छत्रपती शिवाजी पार्क”…🥰_*

*ग्राहकांच्या उत्स्फूर्त😍 प्रतिसादानंतर आम्ही घेऊन आलो🤩 आहोत…! खास *दसरा🎊 ऑफर…!😍🥳💃*

*मंदी नही…! 😍ये संधी है…!🤩*

*_🏡 छत्रपती शिवाजी पार्क🌴_*
*_🌴गृहप्रकल्प-कुडाळ🏡_*

*👉 घेऊन आले आहेत…!स्मार्टसिटीच्या 🛣️ वाटेवर असलेल्या कुडाळात मध्यवर्ती भागात तयार ताबा 1BHK फ्लॅट फक्त १६ लाखात, 2 BHK फ्लॅट फक्त २७ लाखात तोही GST सह, तर १० लाखात मिळावा दुकान गाळा…!*

👉 *_पहिल्या पाच ग्राहकांना ही संधी…😍🥳🤩_*

*आठ बिल्डिंगच्या🏬 भव्य-दिव्य गृह प्रकल्पा 🏡 सोबत १५ हजार स्क्वेअर फूट गार्डन🏕️,गणेश मंदिर🛕,स्विमिंग पूल🗾,क्लब हाउस🏸,जिम 💪आणि प्रशस्त पार्किंगची🚘 सुविधा…!*💃

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी २५० ची मेगा टाऊनशिप…🏬*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून चालत फक्त ३ मिनिटांच्या अंतरावर…🚶‍♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर…🚆*
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*

*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃‍♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️

*🛑 मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*

*🏡 आमचा पत्ता:- साईट शिवाजी पार्क,सत्कार हॉटेल रोड,जुना बस स्टँड समोर,कुडाळ*

*📲 संपर्क :- **९४२२३७९३९९*
*९४२२०६५१८१*
*९४०४७५१५००*
_______________________

 

प्रतिक्रिया व्यक्त करा