अनुभव शिक्षा केंद्राची इचलकरंजी शहर कार्यकारिणी जाहीर
इचलकरंजी: प्रतिनिधी
युवा संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रात सुरू असलेल्या अनुभव शिक्षा केंद्राची इचलकरंजी शहराची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. इचलकरंजी अनुभव कट्ट्याच्या कार्याध्यक्षपदी अमित कोवे, कार्यवाहकपदी नम्रता कांबळे तर सचिवपदी वैभवी आढाव यांची निवड करण्यात आली.
अनुभव शिक्षा केंद्राचे जिल्हा प्रशिक्षक अशोक वरुटे यांनी अनुभवची कार्यपद्धती समजावून सांगितली. त्यांच्या उपस्थितीत झालेल्या निवडीत सहसचिवपदी उर्मिला कांबळे, खजिनदारपदी हर्षद पाटील, संघटकपदी गौरी कोळेकर, समन्वयकपदी सनोफर नायकवडी, सांस्कृतिक प्रमुखपदी दामोदर कोळी, प्रशिक्षण प्रमुखपदी रोहीत दळवी आणि सदस्यपदी ओम कोष्टी, दिग्विजय चौगुले, पवन होदलूर, सुभाग्या कोटगी, अक्षय कांबळे , प्रणिता पाटील यांची निवड करण्यात आली.यावेळी सल्लागार इंद्रायणी पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन करताना राष्ट्रीय युवा धोरणाच्या अंगाने युवा पिढीला सक्षम बनवण्याचा प्रयत्न अनुभव शिक्षा केंद्र करते व त्याचा भाग बनण्याची सुवर्णसंधी तुम्ही घ्यावी , असे मत व्यक्त केले. यावेळी सल्लागार संजय रेंदाळकर, प्रमोद आवळे, प्रशांत खांडेकर, अमोल पाटील, स्नेहल माळी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
🎋🎋🌾🌾🌴🌴🌱🌱🎋🎋🌾
*_शेतकरी, कष्टकरी बांधवांसाठी एक छोटीशी मदत_*
*_🥭🌴आंबा, नारळ, सुपारी,आणि काजू साठी अत्यंत गरजेची असणारी उत्पादने_*
*🎋🌴🌾 Maharashtra agro fertilizer and chemicals* 🎋🌴🌾
*kolhapur*
*_👉डायरेक्ट फॅक्टरी दरांमध्ये, उपलब्ध._*
*_👉मधल्या कुठल्याच मेडीयटरचा समावेश नसल्यामुळे कमी दरांमध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे सेंद्रीय खत उपलब्ध_*
*_👉 कल्पवृक्ष आणि निंबोळी पावडर संतुलन ऑर्डर नुसार पोहच करण्याची व्यवस्था_*
*🔹जमिनीच्या सुपीकते बरोबरच उत्पन्नात देखील भरघोस वाढ*
*🔸पिकांची उत्तम वाढ*
*🔹 रोग प्रतिकारक शक्ती वाढते*
*🔸जमिनीचा सामू समान ठेवण्यास मदत*
*🔹 पानांचा व फळांचा आकार वाढतो*
*🔸फळे मोठी होणे*
*🔹प्रकाश संश्र्लेशन कार्य वाढवते.*
*🔸निरोगी आणि विषमुक्त पिके*
*👉आजच संपर्क करा*
*Maharashta agro fertilizer and chemicals.kolhapur.*
*📲9823857786*
*📲8208657954*
*Advt web link 👇*
———————————————-