*पोलिस अधिकाऱ्याकडून महिला वकिल आणि सहकाऱ्याला निर्दयी पणे मारहाण!*
*महाराष्ट्र बार कौन्सिल कमिटी बरखास्त करा -*
*ॲड. धनंजय जुन्नरकर*
*महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रवक्ता.*
विशेष प्रतिनिधी, मुंबई
सोसायटीतील एका वादाविषयी अँटॉप हिल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेलेले ॲड हरिकेष शर्मा व ॲड साधना यादव या दोन्ही वकिलांना सदर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नासीर कुलकर्णी यांनी गुरुवारी अत्यंत निर्दयपणे मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या निंदनीय प्रकाराचा महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने आणि अनेक वकील संघटनांनी तीव्र निषेध केला आहे. ॲड धनंजय जुन्नरकर ह्यांनी प्रतिपादन केले आहे की वकिलांना पोलीस रोज कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्रास देत आहेत. मार्च महिन्यात देखील बोरिवली बार असोसिएशनचा सदस्य पृथ्वीराज झाला ह्यांना कांदिवली पोलीस ठाण्याचे ए पी आय हेमंत गिते ह्यांनी मारहाण केली होती. सर्व काही CC टीव्ही मध्ये कैद झाले असून देखील आज पर्यंत केवळ चौकशी चा फार्स करून कारवाई टाळली जात आहे.
हॆ प्रकरण ताजे असतानाच
‘अँटॉप हिलमधील दोस्ती शॉपी लिंकमधील एका वादाबाबत तक्रार करण्याकरिता हे दोन्ही वकील गुरुवारी दुपारी पोलिस ठाण्यात गेले होते. त्यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुलकर्णी व त्यांच्या सहकारी पोलिसांनी दोन्ही वकिलांना वरच्या मजल्यावरील खोल्यांमध्ये नेऊन पट्ट्याने, लाथानी मारहाण केली. त्यानंतर दोघांना दहशतीखालीच सायन रुग्णालयात नेऊन वेगळी कारणे दाखवत उपचार करवून पुन्हा पोलिस ठाण्यात आणण्यात आले. तसेच, दोघांना मध्यरात्रीपर्यंत डांबून ठेवत त्यांना पुन्हा बेदम मारहाण करण्यात आली’, असा आरोप आहे. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रातील वकील संघटनामध्ये तीव्र असंतोष आहे.
अमानुष मारहाणीमुळे ॲड साधना यांच्या पायाला व ॲड शर्मा ह्यांना कानांना गंभीर दुखापत झाल्याने त्या शर्मा सध्या सायन रुग्णालयात उपचार घेत आहेत. ॲड साधना या तक्रार मांडत असताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुलकर्णी यांनी त्यांना आवाज खाली करा, असे सांगितले आणि त्यांनाच धमकावले. म्हणून इथे आपल्याला न्याय मिळणार नाही, असे म्हणत आम्ही दोघेही पोलिस ठाण्यातून बाहेर पडत असतानाच कुलकर्णी यांनी, ‘यांना वर घ्या रे’, असे म्हणत कनिष्ठ पोलिसांना आदेश दिला. त्यानंतर आम्हा दोघांनाही नेऊन मारहाण करण्यात आली’, असे ॲड शर्मा यांनी माध्यमाना सांगितले.
वकिलांची संघटना महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल ची कमिटी फक्त नवीन वकिलांकडून 15000 फी घेणे आणि सरकारी मंत्र्यांसोबत स्वतःचे संबंध सांभाळणे इतकेच काम करते आहे, वकिलांना न्याय देण्यासाठी स्वतः काहीही करत नाही त्यामुळे ही कमिटी बरखास्त करावी असे मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड ह्यांना निवेदन करणार असल्याचेही ॲड धनंजय जुन्नरकर म्हणाले.
गृहमंत्री आणि मुख्यमंत्री ह्यावर काही करतील अशी अपेक्षा उरलेली नाही.
एका महिला वकीलला अशा प्रकारे निर्दयी मारहाण महाराष्ट्रात होत असेल तर महिला आयोगाने देखील दखल घ्यायला हवी.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अशी बेबंदशाही चालू देणार नाही असेही जुन्नरकर म्हणाले.
*ऑफर… ऑफर….. ऑफर….💃💃*
*_कुडाळ शहरातील छत्रपती शिवाजी पार्क गृह प्रकल्पात ग्राहकांना मिळणार ” ऑफर”…_*
*_१६ लाखात १ बीएचके, तर २७ लाखात २ बीएचके फ्लॅट; दुकान गाळा फक्त १० लाखात…_*
ऑफर*
*🥳पुन्हा एकदा कुडाळ शहरात १६ लाखात फ्लॅट घेण्याची संधी…!💃*
*_🥰आता आमची नवी ओळख “छत्रपती शिवाजी पार्क”…🥰_*
*ग्राहकांच्या उत्स्फूर्त😍 प्रतिसादानंतर आम्ही घेऊन आलो🤩 आहोत…! खास *दसरा🎊 ऑफर…!😍🥳💃*
*मंदी नही…! 😍ये संधी है…!🤩*
*_🏡 छत्रपती शिवाजी पार्क🌴_*
*_🌴गृहप्रकल्प-कुडाळ🏡_*
*👉 घेऊन आले आहेत…!स्मार्टसिटीच्या 🛣️ वाटेवर असलेल्या कुडाळात मध्यवर्ती भागात तयार ताबा 1BHK फ्लॅट फक्त १६ लाखात, 2 BHK फ्लॅट फक्त २७ लाखात तोही GST सह, तर १० लाखात मिळावा दुकान गाळा…!*
👉 *_पहिल्या पाच ग्राहकांना ही संधी…😍🥳🤩_*
*आठ बिल्डिंगच्या🏬 भव्य-दिव्य गृह प्रकल्पा 🏡 सोबत १५ हजार स्क्वेअर फूट गार्डन🏕️,गणेश मंदिर🛕,स्विमिंग पूल🗾,क्लब हाउस🏸,जिम 💪आणि प्रशस्त पार्किंगची🚘 सुविधा…!*💃
*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी २५० ची मेगा टाऊनशिप…🏬*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून चालत फक्त ३ मिनिटांच्या अंतरावर…🚶♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर…🚆*
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*
*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️
*🛑 मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*
*🏡 आमचा पत्ता:- साईट शिवाजी पार्क,सत्कार हॉटेल रोड,जुना बस स्टँड समोर,कुडाळ*
*📲 संपर्क :- **९४२२३७९३९९*
*९४२२०६५१८१*
*९४०४७५१५००*
_______________________
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*