बाजारपेठेत कही खुशी कही गम
दोडामार्ग
कसई दोडामार्ग नागरपंचायतीचे प्रभाग आरक्षण जाहीर झाले असून आज या आरक्षणाची सोडत महाराजा सभागृहात काढण्यात आली यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून वंदना खरमाळे यांनी काम पाहिले.
ही सोडत कही खुशी कही गम अशी असून सर्वसाधारण पुरुष प्रवर्गासाठी २, ५, ६, ७, ९,११ हे प्रभाग सर्वसाधारण स्त्री १,१२,१३,१५,१६ हे प्रभाग मागासवर्गीय पुरुष ३,८, मागासवर्गीय स्त्री ४,१०, १७ अनुसूचित जाती महिला १४ हा प्रभाग आरक्षित झाला आहे.
यावेळी पक्षीय बळापेक्षा वैयक्तिक संबंधावर ही निवडणूक लढवावी लागणार असून यातून या नगरपंचयातचे भवितव्य ठरणार आहे, मात्र पक्षीय स्ततरावर ही निवडणूक लढल्यास अनेकांची उमेदवारीची भाऊगर्दी तसेच नाराजी नाट्यही पाहावयास मिळणार असल्याचे या आरक्षण सोडतीतून दिसत आहे.